एक्स्प्लोर

Mumbai News : पवई आयआयटीतील विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन 

Crime News : मुंबईतील पवई येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात सातव्या वजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

Mumbai News : मुंबईतील पवई आयआयटीमध्ये  (Indian Institute of Technology Mumbai) एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. दर्शन सोलंकी (वय 18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा (Ahmedabad) असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. कालच (11 फेब्रुवारी) त्याची परीक्षा झाली होती आणि आज (12 फेब्रुवारी) त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दर्शन आयआयटीमध्ये बी. टेकच्या केमिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ आयआयटीच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दर्शनचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पवई पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 
 
दर्शन सोलंकी तीन महिन्यांपूर्वी अहमदाबादहून आयआयटी पवईत आला होता. शिवाय त्याची कालच परीक्षा झाली होती. त्यानंतर त्याने आज आत्महत्या केली. परंतु, दर्शनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

खोलीत बोर्डवर लिहिला संदेश

दरम्यान, दर्शन याने आत्महत्येपूर्वी माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये, असा संदेश लिहिल्याची माहिती मिळाली आहे. दर्शन याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीतील फलकावर संदेश लिहिला होता. त्यामुळे दर्शनने कोणत्या कारणामुळे आयुष्य संपवलं याचं गूढ कायम आहे

पवई पोलिसात अपघाती मृत्युची नोंद

दरम्यान पवई पोलिसांनी दर्शन सोलंकीच्या मृत्युची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे. या प्रकरणी कलम 174 सीआरपीसी अन्वये अपघाती मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. तीन महिन्यांपूर्वीच आयआयटीमध्ये दाखल झालेल्या दर्शन सोलंकीने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Latur Crime: धक्कादायक! कुटुंबीयांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचाच केला गेम; लातूर जिल्ह्यातील घटना

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, एकाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज, नागरिकांमध्ये प्रचंड भीती
वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, एकाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज, नागरिकांमध्ये प्रचंड भीती
Thane Honeytrap Case : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
Pune Crime News: मित्राची कार घेऊन घरातून बाहेर पडला अन्....; फोन बंद झाला, बेपत्ता झाल्याची तक्रार; सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढलेल्या मृतदेहाचं गुढ उकललं
मित्राची कार घेऊन घरातून बाहेर पडला; फोन बंद झाला, बेपत्ता झाल्याची तक्रार अन्....; सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढलेल्या मृतदेहाचं गुढ उकललं

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget