Ratnagiri Crime News: व्हिडीओ कॉलवर तरुण झाला नग्न; ब्लॅकमेल करून महिलेनं उकळले 50 हजार!
Maharashtra Ratnagiri Crime News: अज्ञात महिलेच्या भूलथांपांना बळी पडून तरुण चक्क व्हिडीओ कॉलवर नग्न झाला. महिलेनं ब्लॅकमेल करुन तब्बल 50 हजार रुपये उकळले.
Ratnagiri Crime News: ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) आता काही नवीन राहिली नाही. सध्या दररोज ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान ऑनलाईन फसवणुकीचा असाच एक धक्कादायक गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Ratnagiri Gramin Police Station) हद्दीत घडला आहे. अज्ञात महिलेनं व्हिडीओ कॉल (Video Call) करत तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याचा निर्वस्त्र अवस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड करून पीडित तरुणाकडून 50 हजार रुपये उकळले गेले आहेत. यानंतर तरुणानं रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित तरुण आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय घडलं त्या दिवशी?
गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022. रत्नागिरीतील एका तरुणाला एक व्हिडीओ कॉल आला. तरुणानं ज्यावेळी हा कॉल उचलला त्यावेळी समोर एक महिला बोलत होती. तरुण देखील तिच्याशी बोलू लागला. बोलता बोलता महिलेनं तरुणाचा विश्वास संपादन केला. अखेर ही गोष्ट इतकी पुढे गेली की, व्हिडीओ कॉलवरती बोलणारी महिला निर्वस्त्र झाली. तिनं तरुणाला देखील निर्वस्त्र होण्यास सांगितलं. महिलेच्या भूलथापांना बळी पडलेला या व्हिडीओ कॉल दरम्यान तरुणही निर्वस्त्र झाला. हीच संधी साधत महिलेनं या तरुणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
संपूर्ण बोलणं झाल्यानंतर काही वेळानंतर याच महिलेचा तरुणाला फोन आला. यावेळी मात्र तिनं थेट तरुणाला धमकीच दिली. "तुझा नग्न आणि निर्वस्त्र अवस्थेतील व्हिडीओ माझ्याकडे आहे. त्या बदल्यात मला पैसे दे. नाहीतर तुझा व्हिडीओ युट्युबवर अपलोड करिन.", अशी धमकी महिलेनं तरुणाला दिली. बदनामीच्या भीतीपोटी तरुणानं या महिलेला 50 हजार 500 रुपये ट्रान्सफर केले. नंतर या तरुणानं थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस देखील झालेला सारा प्रकार एकूण चक्रावून गेले. त्यांनी या प्रकरणांमध्ये आता अज्ञात महिला आणि तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे.
भूलथापांना बळी पडू नका!
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आपण रोज ऐकत असतो. काही वेळेला ते आपल्या बाजूला देखील घडतात. पण त्यातून देखील आपण कोणताही धडा घेत नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवताना काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बड्डेच्या पार्टीचं बिल का भरलं म्हणत मित्रावरच चाकूने हल्ला; कल्याणमधील खळबळजनक घटना