(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाडी चोरी करणाऱ्या सर्वात मोठी गॅंग म्हणून ओळख असणाऱ्या 'प्रतापगड गेंगे' च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
वाहन चोरी करणारे ही सर्व लोकं "प्रतापगड गॅंग" नावाने प्रसिद्ध असलेली गाडी चोरणाऱ्या टोळीचे सदस्य होते. या प्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक केली आहे तर अनेक वाहन ही जप्त केली आहे.
मुंबई : लॉकडाउनचा फायदा घेत चोरांनी मोठ्या प्रमाणावर वाहन चोरी केल्याचा प्रकार उघड झाल आहे. मुंबई पोलिसच्या प्रॉपर्टी सेलमार्फत अंतरराज्यीय वाहन चोरी करणाऱ्या एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वाहन ज्प्त करण्यात आले आहेत. वाहन चोरी करणारे ही सर्व लोकं "प्रतापगड गॅंग" नावाने प्रसिद्ध असलेली गाडी चोरणाऱ्या टोळीचे सदस्य होते. या प्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक केली आहे तर अनेक वाहन ही जप्त केली आहे.
झटपट पैसा कमावण्यासाठी अनेक राज्यतून इको कार आणि सोबतच इतर वहानांची चोरी करणार्या एका टोळीच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पोलिसांनी अटक केली आहे. इको कारमध्ये जास्त जागा असल्याने त्याचा वापर पॅसेंजर वाहतूक करण्यासाठी राजस्थान, गुजरात,मध्य प्रदेश आणि इतर राज्यात होतो. म्हणून ह्या ECCO कारची जास्त मागणी होती. त्याचबरोबर ECCO च्या सायलन्सरमध्ये हेलकॉम पावडर मिळत असल्याने इको कारला चोरटे टार्गेट करत होते.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहन चोरीची तक्रार मिळत होती. महाराष्ट्र , गुजरात आणि इतर अनेक राज्यतून गाडी चोरी झाल्याची माहिती समोर येत होती. त्यामध्ये ECCO गाडी जास्त चोरीला जात होती. पोलिसांनी जेव्हा तपास केला तर धक्कादायक माहिती समोर आली. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात ECCO गाडीची जास्त मागणी होती कारण ह्या गाडीचा वापर पॅसेंजर कार म्हणून केला जात होता. म्हणून त्याची विक्री जास्त होत होती. त्याचबरोबर ECCO गाडीचा सायलेंसर सुद्धा चोरीला जात होते. कारण सायलन्सरचे तेरा ते चौदा हजार रुपये चोरांना मिळत होते. इको कारच्या सायलन्सरमध्ये असलेल्या पेटीसारख्या बॉक्समध्ये हेलकॉम पावडर मोठ्या प्रमाणात साठते. या पावडरचा वापर पांढरे सोने पॉलिश करण्यासाठी होतो. त्यामुळे या एक किलो पावडरला 15 हजार इतका भाव मिळतो.
ह्या प्रकरणात विशेष बाब अशी आहे की, चोरांनी लॉकडाउनमध्ये सुद्धा मोठा फायदा घेतला. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून आरोपींना अटक केली गेली आहे. त्यात चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त केली आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच या प्रकरणात अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. कारण वाहन चोरीचे हे रॅकेट अनेक राज्यात पसरले आहे.