एक्स्प्लोर

Karjat Triple Murder : रेशन कार्ड आणि घरपट्टी वादातून सख्ख्या भावाची, गरोदर वहिणीची हत्या; नेरळच्या तिहेरी हत्याकांडाची उकल

Neral Triple Murder : रायगड जिल्ह्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात मृताच्या सख्ख्या भावाला अटक करण्यात आली असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं उघड झालं. 

रायगड : नेरळमधील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडाची उकल झाली असून सख्ख्या भावानेच तिघांची हत्या केल्याचं समोर आलं. लहान भावाने त्याचा मोठा भाऊ, त्याची गरोदर असलेली बायको आणि आठ वर्षांचा मुलगा या तिघांची हत्या केली. रेशनकार्ड आणि घरपट्टी वादातून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून ही हत्या करण्यात आली होती. 

नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे चिकन पाडा येथे मदन पाटील आणि त्यांच्या परिवाराची हत्या झाल्याची घटना घडली होती. यामध्ये मदन पाटील,  त्यांची गरोदर पत्नी अनिशा आणि त्यांचा आठ वर्षाचा मुलगा विवेक पाटील यांचा मृतदेह हा घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती. यानंतर रायगड जिल्ह्यात या तिहेरी हत्याकांडात आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटना घडल्यानंतर दोन दिवसातच या आरोपीला रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसार माध्यमांशी या प्रकरणाचा खुलासा करत माहिती दिली.

रेशनपट्टी आणि घरपट्टी वादातून हत्या

अलिबाग गुन्हे अन्वेषण पथकाने या तपासाची सूत्रे हाती घेत सदर तिहेरी हत्याकांड  प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील याला ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण हकीकत समोरं आली आहे. रेशन कार्ड आणि घरपट्टी वादातून ही हत्या झाल्याची कबुली आरोपी हणमंत पाटील याने पोलिसांना दिली. यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून कट रचला

नेरळमधील 40 वर्षीय मदन पाटील, 35 वर्षीय अनिशा पाटील आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विवेक पाटील यांची ते शनिवारी रात्री झोपलेले असताना डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. हत्या करण्यापुर्वी विषप्रयोग झाला होता का यासाठी व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी म्हणजे मृत पुरुषाच्या भावाला दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका पाहून हा कट सुचल्याचं तपालात समोर आलं आहे. 

पोशिर गावातील चिकनपाडा या गावात एका मृत व्यक्तीची दशक्रिया विधी सुरू असताना नदीवर गेलेल्या ग्रामस्थांना पाणी वाहणाऱ्या नाल्यात एक आठ वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यांनंतर या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Embed widget