एक्स्प्लोर

Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू

Dhule Family Suicide: धुळे शहरातील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरासे कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. जोडप्याने दोन लहान लेकरांसह जगाचा निरोप घेतला.

धुळे: शहरातील प्रमोद नगर भागात एका जोडप्याने आपल्या लहान मुलांसह आत्महत्या (Dhule Suicide) केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. प्रवीण गिरासे आणि दीपा गिरासे (Dhule Family Suicide) या दाम्पत्याने आपल्या मितेश आणि सोहम या दोन लहान मुलांसह आयुष्याची अखेर केली होती. प्रवीण गिरासे यांची बहीण गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी आली तेव्हा घराचा दरवाजा वरच्यावर लावला होता. तसेच घराच्या आजुबाजूला दुर्गंधी येत होती. तिने दरवाजा उघडला तेव्हा पहिल्या मजल्यावर प्रवीण गिरासे (Girase Family Dhule) यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तर बेडरुममध्ये गिरासे यांची पत्नी दीपा आणि मितेश व सोहमचा मृतदेह होता. या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता.  गिरासे कुटुंबाने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पोलिसांनी गिरासे यांच्या घराची झडती घेतली तेव्हा प्रवीण गिरासे यांच्या मृतदेहाच्या बाजूला पोलिसांनी एक सुसाईड नोट आढळून आली. यात आम्ही सर्वजण आत्महत्या करीत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही सुसाईड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

गिरासे कुटुंबीयांचा मृत्यू घातपातामुळे?

प्रवीण गिरासे यांनी आपल्या शेजाऱ्यांना मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरासे कुटुंबीय कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. मंगळवारपासून त्यांचा दरवाजा बंदच होता. घरातील चारही मृतदेह कुजायला लागल्यानंतर त्याची थोडीफार दुर्गंधीही पसरली होती.  प्रवीण गिरासे यांनी आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असे सुसाईड नोटमध्ये सांगितले असले तरी त्यांच्या नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

प्रवीण गिरासे व त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रवीण गिरासे यांचे लामकानी, तसेच धुळे शहरात खते बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच नितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते. नितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता.

तर दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांचे कुटुंब आत्महत्या करूच शकत नाही. त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget