एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?

श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी आलेले आर्थिक संकट अजूनही लोकांच्या मनात आहे. यामुळेच देशातील सर्वात मोठे घराणे 'राजपक्षे' गेल्या दोन दशकांपासून प्रथमच या शर्यतीतून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

Sri Lanka Presidential Elections : दोन वर्षांपूर्वींच्या अराजकता आणि अंतर्गत यादवीनंतर श्रीलंकेत उद्या (21 सप्टेंबर) शनिवारी राष्ट्रपतीपदासाठी (Sri Lanka presidential elections) निवडणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) च्या अध्यक्षपदाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके (Anura Kumara Dissanayake) राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर आहेत. ते चीन समर्थक मानले जातात. अनुरा यांनी निवडणूक जिंकल्यास अदानी प्रकल्प रद्द  करण्याची घोषणा केली आहे. 

आर्थिक संकट अजूनही लोकांच्या मनात 

अनुरा यांच्याशिवाय (Anura Kumara Dissanayake) आणखी तीन मोठे उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वेक्षणात विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे त्यांच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे हेही या शर्यतीत आहेत. त्यांच्या जिंकण्याची शक्यता कमी असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी आलेले आर्थिक संकट अजूनही लोकांच्या मनात आहे. यामुळेच देशातील सर्वात मोठे घराणे 'राजपक्षे' गेल्या दोन दशकांपासून प्रथमच या शर्यतीतून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

अनुरांचा भारताला विरोध, आता मैत्री वाढली

अनुरा कुमारा दिसानायके या डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (JVP) च्या नेते आहेत. एनपीपी आघाडीकडून ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, जेव्हीपी पक्ष भारताच्या विरोधासाठी ओळखला जातो. 1980 च्या दशकात भारताने श्रीलंकेत एलटीटीईला सामोरे जाण्यासाठी शांतता रक्षक दल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा जेव्हीपीने विरोध केला होता. अलिकडच्या वर्षांत JVP ने आपली भारतविरोधी भूमिका बदलली आहे. मात्र, अनुरा यांनी निवडणुकीपूर्वी अदानींविरोधात वक्तव्य करून नवा वाद सुरू केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यास श्रीलंकेतील अदानी समूहाचा पवन ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. अदानी प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका असल्याचे अनुरा यांचे म्हणणे आहे. अदानी समूहाने पवन ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी यावर्षी श्रीलंका सरकारसोबत करार केला आहे. यासाठी कंपनी 442 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 367 कोटी) गुंतवणूक करणार आहे.

भ्रष्टाचाराविरोधात वक्तव्य करून अनुरा तरुणांमध्ये लोकप्रिय 

गेल्या चार वर्षांत अनुरा दिसानायके आणि एनपीपी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. श्रीलंकेतील लोकांना आर्थिक सुधारणा आणि सामाजिक समानतेसाठी एनपीपीकडून खूप अपेक्षा आहेत, कारण ते यापूर्वी कधीही सत्तेत नव्हते त्यामुळे लोकांचा त्यावर अधिक विश्वास आहे. अनुरा कुमार दिसानायके तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. एनपीपीच्या वाढत्या लोकप्रियतेचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आश्वासन. अनुरा प्रत्येक मोहिमेत श्रीलंकेला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन देत आहेत. देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचे मुख्य कारण भ्रष्टाचार आहे, असे तरुणांना वाटते.

पक्षाने मजबूत आंतरराष्ट्रीय संबंधांवरही काम केले आहे. चीन आणि भारत हे श्रीलंकेचे दोन मोठे आर्थिक भागीदार आहेत. पक्षाने डिसेंबर 2023 मध्ये चीनला भेट दिली आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे, NPP शिष्टमंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट दिली आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

रनिल विक्रमसिंघे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत

रानिल विक्रमसिंघे हे अपक्ष उमेदवार म्हणून आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी श्रीलंकेतील उजव्या विचारसरणीच्या युनायटेड नॅशनलिस्ट पार्टीचा राजीनामा दिला होता. विक्रमसिंघे त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मिळालेल्या राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचा संदर्भ देत असल्याचे दिसते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget