Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Nashik News : शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच टोकाचं पाऊल उचललं आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकमधील गौळणे गावातील कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एक आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याने नाशकात (Nashik News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने (Engineering Student) महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिताने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून (Nashik Police) पुढील तपास केला जात आहे. नाशिक शहरात महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
नाशकात पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या
दरम्यान, नाशिकमधील गौळणे गावातील विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली. बॉस कंपनीत कामगार असलेल्या विजय सहाने यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी कंपनीवर आरोप केले आहेत. विजयच्या आत्महत्येचे कारण हे कंपनीतील प्रशासन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नाशिकच्या बॉश कंपनीमध्ये विजय सहाने हे गेल्या बारा वर्षांपासून कामावर होते. कंपनीच्या जाचक नियमांमुळे विजय हे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केल्याचं पाऊल उचललं असल्याची माहिती विजयच्या कुटुंबांनी दिली.
नाशकात टवाळखोरांवर कारवाईचा बडगा
नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नाशिक शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून टवाळखोरांवर सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली आहे. काल नाशिक शहरात 92 जणांवर कारवाई करण्यात आली असून 36 कॉलेज आणि शाळांना भेट देत नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. महाविद्यालय परिसरातील कॅफे, हॉटेल, पान टपरी, चहा टपरी परिसरात पोलिसांचा वॉच असल्याचे दिसून येत आहे. वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास करणारे, तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात महिला व मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू