एक्स्प्लोर

NEET Paper Leak Case : नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल; पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत 

NEET Exam : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्र सरकारने परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआयला तपास करण्यासाठी दिले होते. नुकताच या प्रकरणी आता सीबीआय कडून FIR दाखल करण्यात आला आहे.

NEET Paper Leak Case Latur :  नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak Case) दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षा (NEET PG Exam) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार (Bihar) कनेक्शननंतर आता महाराष्ट्र (Maharashtra News) कनेक्शन समोर आलं आहे. नीट (NEET Exam) पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं (Nanded ATS) ताब्यात घेतलं आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान, नांदेड एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या चौकशी अंती या प्रकरणी आता सीबीआय कडून एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने काल रविवारच्या रात्रीनीट (NEET Exam) परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआय ला तपास करण्यासाठी दिले होते. नुकताच या प्रकरणी आता सीबीआय कडून FIR दाखल करण्यात आला आहे.

चौकशीअंती सीबीआय कडून FIR दाखल

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (NEET) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात.

त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. दोघांनाही तात्काळ एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं. परिणामी आज केलेल्या चौकशीअंती सीबीआय कडून एफ आय आर (FIR) दाखल करण्यात आला आहे.  

नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली 

नीट पीजी परीक्षार्थींसाठी मोठी बातमी आहे. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. आज नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाही. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget