एक्स्प्लोर

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

चाळ माफिया कोणालाही न जुमानता चाळी बनवत होते. महत्त्वाचे  म्हणजे चाळ माफिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीतील घरांची विक्री करत होते.

 वसई :   स्वस्त दरात चाळीत रुम बनवून देण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक (Fraud)  करणाऱ्या एका  बिल्डरला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे.  दीपक राजेंद्रबहादूर सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. या परिसरात अनेक चाळ बिल्डरांनी जवळपास एक कोटीची फसवणूक केल्याच समोर आलं आहे. 

 वसई पूर्वेच्या वाघराल पाडा, राजवली येथे परप्रांतीय चाळ माफियांनी सरकारी जमिनी, आदिवीसी जमिनीवर बनवलेल्या चाळीबाबत एबीपी माझाने वेळोवेळी बातमी दाखवली होती. माञ तरीही या परिसरात चाळ माफिया कोणालाही न जुमानता चाळी बनवत होते. महत्त्वाचे  म्हणजे चाळ माफिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीतील घरं ही विकत होते.  माणिकपूर पोलिसांत सिध्दार्थ इंगळे यांनी चाळ माफियांनी जाहिरात पत्रक छापून स्वस्त दरात घर देतो म्हणून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन, त्यात एका आरोपीला अटक केली आहे. 

डोंगर गिळकृंत करुन चाळी

या परिसरात चाळ माफियांनी जवळपास 33 ते 34 सामान्य नागरिकांची 1 कोटी 17 लाखाची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या गुन्ह्यात आणखीन सात ते आठ आरोपी असून, सध्या ते फरार असल्याच पोलिसांनी  सांगितलं आहे. वसईच्या वाघराल पाडा राजीवली येथे परप्रांतीय भूफायांनी सरकारी जमिनी, आधिवासी जमिनी, डोंगर गिळकृंत करुन, चाळी बनवल्याची बातमी एबीपी माझाने सर्वात प्रथम 2018  साली दाखवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही आपल्या भाषणात यावर आवाज उठवला होता.  

गरीब जनतेची फसवणूक

 जुलै 2022 रोजी येथे दरड कोसळून दोघांचा मृत्यू देखील  झाला होता. तरीही त्या राजवली वाघराल पाडा येथे चाळी उभ्या राहत होत्या आणि विक्री देखील होत होती. गरीब जनतेची फसवणूक होत होती. तर पालिकेचे अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सामान्य नागरीकांनी वेळोवेळी केला होता.

अनधिकृत चाळींमध्ये  झपाट्याने वाढ 

वीज व पाणी सुविधा, कमी पैशात हक्काचे घर, कर्जाची सुविधा या आकर्षक मथळ्याखाल सार्वजनिक ठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींन आकर्षित होऊन सर्वसामान्य नागरिक बळी पडतात. ठाणे, टिटवाळा, कल्याण या भागात  संपूर्ण डोंगर गिळकृत करून त्या ठिकाणी अनधिकृत चाळी  झपाट्याने फुलविल्या जात आहेत . वेळीच या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर उर्वरित टेकड्या व अन्य जागांवरही संस्कृती उभी राहण्याची भीती आहे. 

हे ही वाचा :

Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
Rohit Sharma & Jasprit Bumrah : इकडं BCCI टीम इंडियाला सव्वाशे कोटींचा तोफा देणार अन् तिकडं ICCकडून रोहित अन् बुमराहला स्पेशल गिफ्ट!
इकडं BCCI टीम इंडियाला सव्वाशे कोटींचा तोफा देणार अन् तिकडं ICCकडून रोहित अन् बुमराहला स्पेशल गिफ्ट!
VIDEO : ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा, त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष
ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा, त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष
Embed widget