एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या कपिलेश्वर मंदिरात चोरी, भाविकांमध्ये खळबळ; पोलीस तपास सुरू
कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हणून येथील शिवलिंग कपिलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. आज जेथे कपिलतीर्थ मार्केट आहे ते पूर्वीचे कपिलतीर्थ तळे होते. या तळ्याच्या काठावरच हे कपिलेश्वर महादेवाचे मंदिर आहे.

Kolhapur kapileshwar temple thieft
1/7

कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हणून येथील शिवलिंग कपिलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. आज जेथे कपिलतीर्थ मार्केट आहे ते पूर्वीचे कपिलतीर्थ तळे होते. या तळ्याच्या काठावरच हे कपिलेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
2/7

कपिलेश्वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत. जो काही धार्मिक निर्णय घ्यायचा तो या कपिलेश्वराच्या साक्षीने एवढे त्याचे महत्व येथील भाविकांमध्ये आहे. मात्र, याच कपिलेश्वर मंदिरात चोरीची घटना घडली आहे.
3/7

कोल्हापूरचे ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरात चोरी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येथील कपिलेश्वर मंदिरातील शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेकपात्र तसेच पूजेच सर्व साहित्य चोरीला गेल्याने खळबळ उडाली.
4/7

मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा देखील चोरट्यांनी लंपास केला आहे. काल शुक्रवारी ही चोरीची घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरण, पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
5/7

कोल्हापूरकरांचे ग्रामदैवत म्हणून कपिलेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज भाविक भक्तांची येथे गर्दी असते. तर, श्रावण महिन्यात येथे मोठ्या गर्दीने भाविकाचा उत्सव भरतो.
6/7

कपिलेश्वर मंदिर प्राचीन असून पूर्वाभिमूख आहे. मंदिरात प्रवेश करताच आपणास सुंदर नक्षीकाम केलेल खांब दिसून येतात. मंदिराच्या दोन्ही बाजूस श्री गणरायांच्या मूर्ती आहेत.
7/7

मंदिरातील देवळ्यांमध्ये उमा माहेश्वराची मूर्ती व हनुमानाची मूर्ती आहे. तर, गाभाऱ्यामध्ये कपिलेश्वरांचे शिवलिंग पाहावयास मिळते.
Published at : 15 Jun 2024 05:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
