एक्स्प्लोर

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

विशाल अग्रवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी दोन गुन्ह्यात आरोपीस जामीन मिळाला आहे. मात्र, क्ताचे नमुने बदलण्याचा आणखी एक गुन्हा नोंद असल्याने सध्या मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे.

पुणे : पुण्यातील (Pune)  कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात (Kalyani Nagar Porsche Car Accident)  प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal)  आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agrawal)  यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अग्रवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन पैकी दोन गुन्ह्यात त्यांना जामीन (Bail) मंजूर झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र, आणखी एका गुन्ह्यात कोठडीत असल्याने आरोपी विशाल अग्रवालचा (Visha Agarwal) मुक्काम अद्यापही तुरुंगातच असणार आहे. मात्र अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालचा बाहेर येण्याचा मार्ग न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोकळा झालाय.  

ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र विशाल अग्रवालवर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हाताशी धरुन अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आणखी एक गुन्हा नोंद आहे.  त्या प्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल हे पती पत्नी येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालची येरवडा कारागृहातून लगेच सुटका होणार नाही. मात्र सुरेंद्र कुमार आगरवालचा बाहेर येण्याचा मार्ग न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडिलांसह आजोबांवरही पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून सध्या अख्ख कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे.   

विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. तसेच, बिल्डर असल्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणीही अग्रवालवर गुन्हा दाखल आहे. 

कोणकोणाला केली होती अटक?

अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलानंतर या प्रकरणात मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी आणि अजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली. तसंच ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी देखील या प्रकरणात अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलाला 25 जून रोजी बालसुधारणागृहातून मुक्त करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत.  

हे ही वाचा :

Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
Embed widget