दाऊदच्या ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा एनसीबीकडून पर्दाफाश, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
मुंबई, महाराष्ट्रात आणि भारतात आरिफ हा सर्वात मोठ ड्रग्ज डिलर असून हा ड्रग्ज माफिया कैलास राजपूत गँगसाठी काम करत होता. त्यामुळेच आरिफवर झालेली कारवाई ही सर्वात मोठी मानली जात आहे.
मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून सुरू झालेली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडक कारवाई अजूनही थांबत नाहीये. काल एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या मुंबईच सुरु असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. यामुळे भारतात अंमली पदार्थ विकणार्या टोळीचे कंबरडे मोडण्यात त्यांना यश आले आहे.
आतापर्यंत छोट्या-मोठ्या ड्रग पेडलर्ससला अटक करणाऱ्या एनसीबीने काल दाऊदशी थेट संबंध असणाऱ्या अरिफ भुजवाला या ड्रग लॉर्डच्या घरात घुसून कारवाई केली आहे. डोंगरी या दाऊदच्या भागातच तो राहतो. त्याच्या घरात दहा ते बारा किलो वेगवेगळ्या ड्रग्जसोबत ड्रग्स बनवणारी एक फॅक्टरी देखील सापडली आहे. एनसीबीने कारवाई केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मासा असल्याचे एनसीबीचे अधिकारी सांगतात. आरिफ हा डोंगरी भागात नूर मंजिल नावाच्या इमारतीत राहत होता.
ही फक्टरी चालवण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे. आरिफच्या घरी तब्बल दोन कोटी 18 लाख रुपयांची रोकड देखील एनसीबीला सापडली आहे. ही फॅक्टरी चालवणारा सराईत आरोपी आरिफ भुजवाला हा सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी NCB ने लूक आऊट नोटीस जारी केली आहे, असे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
अरिफ एनसीबीच्या जाळ्यात आला कारण त्याअगोदर एनसीबी अधिकाऱ्यांनी नवी मुंबई आणि भिवंडीमध्ये दोन ठिकाणी रेड टाकली होती. नवी मुंबईतील घणसोली येथे केलेल्या कारवाई त्यांना चींकू पठाण हा दाऊदचा हस्तक आणि गॅंगस्टर रंगेहाथ पकडला गेला.
कोण आहे चिंकु पठाण?
चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि दाऊदचा हस्तक आहे. NCB च्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरात 52 ग्रॅम ड्रग्ज आणि 9 एम एमचे रिकामे पिस्तूल सापडले. चिंकूने तो राहत असलेल्या गल्लीत कॅमेरे लावले होते. एवढचं काय तर घरात कुणालाही प्रवेश नव्हता. अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून त्याने घराबाहेर बायोमॅट्रीक मशीन लावली होती.
या कारवाईतून मिळालेल्या माहितीच्या आधारावरचं NCB ने भिंवडीत एक कारवाई करत, या टोळीचा हस्तक रोहित वर्मा याला NCB ने अटक केली. यावेळी अटकेची कारवाई टाळण्यासाठी रोहितने अनेक उचापती केल्या. परिसरातील नागरिकांना जमवून गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. मात्र NCB च्या अधिकाऱ्यांसमोर काहीच चालत नसल्याने सुटकेसाठी त्याने अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला, असे समीर वानखेडे यांनी सांगितले.
आरिफच्या घरातही NCB ला एक स्मिथ वासन कंपनीचे रिव्हाल्वर सापडले आहे. आरिफचे अनेक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विकणाऱ्या गुन्हेगारांसोबत थेट संबंध होते. तो हा काळाबाजार करून आरामात आपले आयुष्य घालवत होता. याच्या घरात 8 ते 9 महागड्या कारच्या चाव्या सापडल्या आहेत. NCB च्या अधिकाऱ्यांना आरिफच्या ड्रग्ज फॅक्टरीतून 2 ते 3 डायरी सापडल्या आहेत. त्यात त्याने ड्रग्ज संदर्भातले व्यवहार लिहून ठेवले आहेत.
मुंबई, महाराष्ट्रात आणि भारतात आरिफ हा सर्वात मोठ ड्रग्ज डिलर असून हा ड्रग्ज माफिया कैलास राजपूत गँगसाठी काम करत होता. कैलास राजपूत आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हे या तस्करीतील मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळेच आरिफवर झालेली कारवाई ही सर्वात मोठी मानली जात आहे. आरिफ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीतील आणखीन मोठ्या माश्यांना एन सी बी जाळ्यात ओढेल यात शंका नाही.