एक्स्प्लोर

मोठी बातमी: नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने आदेश, म्हणाले...

Nagpur Accident : नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन प्रकरणाची घटना समोर आली असून यात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आहे.

Nagpur Accident News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामागील कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वाहने उडवत ही कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. यात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. 

2 मजुरांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय. यात  एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेले आहे. धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

आरोपींना कठोर शिक्षा होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. या घटणेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.  

वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या मद्यधुंद अवस्थेतील सात मित्रांचे कृत्य

या हिट अँड रन प्रकरणात अपघातग्रस्त कारमध्ये भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे, आणि  ऋषिकेष चौबे हे सात मित्र होते. हे सात हि मात्र वंश झाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर पार्टी करायला गेले. दरम्यान, कार हि सौरभ कडुकरच्या मालकीची असून पार्टी केल्यानंतर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व 20 ते 22 वयोगटातील तरुण असून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असतांनाही त्यांनी नागपूरच्या आऊटर रिंग रोड फिरायचा बेत आखला आणि गाडी दिघोरी रोड मार्गे जायचे ठरवले. रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त भागात एक विवाह सोहळा सुरु होता. त्यामुळे तेथे  थोडी गर्दी आणि वाहनांची रेलचेल होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray and Aaditya Thackeray : PMC Action on Bar : बाणेर परिसरातल्या 'द कॉर्नर लाऊंज' बारवर पुणे पालिकेचा हातोडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Embed widget