ना OTP आला, ना कोणत्या लिंकवर क्लिक केलं, तरीही खात्यामधून 3 लाख गेले
मुंबई : मुंबई सायबर पोलिसांकडे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार आलाय, तो वाचून तुम्हीही चकीत व्हाल. 20 वर्षीय आयटी प्रोफेशनल मुलीने आपल्या बँकमधून तीन लाख रुपये गेल्याची तक्रार केली आहे.
मुंबई : मुंबई सायबर पोलिसांकडे (mumbai cyber crime) फसवणुकीचा धक्कादायक प्रकार आलाय, तो वाचून तुम्हीही चकीत व्हाल. 20 वर्षीय आयटी (IT) प्रोफेशनल तरुणीने आपल्या बँकमधून (Bank Account) तीन लाख रुपये गेल्याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, त्या मुलीने कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही अथवा ओटीबी कुणासोबतही शेअर केला नाही. तिच्या बँक खात्यामधून तीन लाख रुपये लंपास झालेत.
20 वर्षीय आयटी प्रोफेशनल तरुणी मागील काही वर्षांपासून एका परदेशी कंपनीसोबत काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती मुलगी तीन लाख रुपयांच्या सायबर फ्रॉडची शिकार झाली. पीडितेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, डिसेंबरमध्ये कार्यालयातील टेलिग्राम अॅपवर एकाच वेळी अनेक मेसेज आले होते. सुरुवातीला त्या संदेशांना स्पॅम समजून दुर्लक्ष केले, परंतु एका मेसेजने आश्चर्यचकित केले. कारण, त्या मेसेजमध्ये तिचा मेल आयडी होता. तो मेसज त्या मुलीने व्यवस्थीत वाचला. जर तुम्हाला फंड हवा असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यामध्ये म्हटले होते. हा मेसेज पहिल्यांनतर मुलीने तात्काळ आपले बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले. एका बँक खात्यामधून जवळपास दोन लाख तर दुसऱ्या बँक खात्यामधून 1.6 लाख रुपये गायब झाल्याचे समजलं. दोन्ही बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर पैसे युपीआयच्या माध्यमातून लंपास केल्याचं समजलं. यूपीआयच्या माध्यमातून कुणीतरी एक हजार, दोन हजार, पाच हजार रुपयांची रक्कम काढली. त्याशिवाय 20 हजार आणि 40 हजार रुपयांची रक्कम आयएमपीएसच्या माध्यामातून काढल्याचं समोर आले.
बँक अधिकाऱ्यांचा समावेश ?
तक्रार करणाऱ्या तरुणीच्या मते, कुणीतरी पासवर्ड अथवा क्रेडेंशियल शेअर केलाय. मी कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही अथवा पासवर्ड, ओटीपी शेअर केला नाही. यामध्ये बँक कर्मचाऱ्याची सायबर गुन्हेगारासोबत मिलीभगत असेल. मुलीने डाटा लीक करण्याचा आरोपही केलाय.
ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती घेतल्याशिवाय कोणीही बँकांमधून पैसे कसे काढू शकतो? असा सवाल तक्रारदार तरुणीने उपस्थित केला. याचाच अर्थ कोणीतरी त्याच्या बँक खात्यापर्यंत पोहचलेय. बँक पासवर्ड वगैरे मिळवला किंवा हॅक झाला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तो पवई पोलिसांकडे वर्ग केला आहे. सायबर पोलीस आणि मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सायबर गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी काय कराल?
सायबर हेल्पलाइन नंबर 1930 आणि पोलीस कंट्रोल रुम क्रमांक 100 वर कॉल करुन तात्काळ मदत मांगा. त्याशिवाय तुम्ही @cyberdost, @mumbaipolice आणि @cpmumbaipolice यांना टॅग करत ट्वीटही करु शकतात.