(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : मुंबईमध्ये ओला चालकाकडून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपीला 30 मेपर्यंत पोलीस कोठडी
Mumbai Crime : मुंबईमध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओला चालकाकडून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Mumbai Crime : ओला टॅक्सीने (Ola Cab) महिलांनी एकट्याने प्रवास करणे किती सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मुंबईत पुन्हा अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे ओला टॅक्सीने महिलांनी प्रवास करावा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत ओला चालकाकडून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील हायप्रोफाईल आरे कॅालनीत राहणारी एक अल्पवयीन मुलगी भोपालहून मुंबईला विमानाने आली. विमानतळावरुन घरी आरे काॅलनी येथे जाण्याकरता त्या मुलीने ओला टॅक्सी बूक केली. मुलगी ओला टॅक्सीत बसल्यानंतर तिचा प्रवास सुरु झाला. मुलगी जेव्हा आरे काॅलनीत येथे पोहोचली तेव्हा तिच्याकडे टॅक्सी भाडे देण्याकरता सुट्टे पैसे नव्हते. मुलीने घरून सुट्टे पैसे आणून देतो असे ओला चालकाला सांगितले. त्यावेळी ओला टॅक्सी चालक मुरारी सिंह याने पैसे न देता त्या बदल्यात तिझ्याकडून शरीर सुखाची मागणी केली. यावर मुलीने रागाने नकार देताच ओला टॅक्सी चालक मुरारी तिथून निघून गेला.
मुलीने हा सर्व घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगताच त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. प्रवासा दरम्यान देखील मुरारी त्या मुलीकडे सतत वाईट नजरेने बघत होता आणि त्याने तिला मैत्री करशील का असं देखील विचारलं होतं. पीडित मुलीने तक्रारीत ही सर्व माहिती पोलिसांना सांगितली आहे.
Maharashtra | An Ola cab driver arrested from Goregaon in Mumbai for allegedly molesting a 15-yr-old girl & making obscene gestures towards her on 25 May. The case was registered by Aarey Police Station. The accused has been sent to Police custody till 30 May: PSI Sachin Panchal pic.twitter.com/OO3hXqqR8w
— ANI (@ANI) May 28, 2022
आरे पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताच तात्काळ सुत्रे हलवली आणि परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक तपास करत मुरारी सिंह याला गोरेगाव पश्चिम येथून अटक केली. तपासा दरम्यान आरोपी मुरारीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिकारी सुनिल पांचाळ यांनी ही माहिती दिली आहे.