(Source: Poll of Polls)
त्यानं 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड लावला, अन् पत्नीच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल; मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील आत्महत्येमुळं खळबळ!
अॅनिमेशन कंपनीत काम करत असलेल्या एका 41 वर्षीय व्यक्तीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केलीय.

Mumbai Crime : पत्नीच्या जाचाला कंटाळून एका 41 वर्षीय व्यक्तीने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव निशांत त्रिपाठी असून ते गेल्या अनेक वर्षांपासून अॅनिमेशन क्षेत्रात काम करत होते. त्यांनी हॉटेलमधील टॉयलेटमध्ये गळफास लावून स्वत:ला संपवलं आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी थेट कंपनीच्या संकेतस्थळावरच आत्महत्येचं कारण सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार निशांत त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते. ते अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करत होते.आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदर ते मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात होते. त्यांनी 28 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या हॉटेलच्या रुमबाहेर 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड लावला होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी मास्टर कीच्या मदतीने हॉटेलचा दरवाजा उघडला.त्यानंतर निशांत त्रिपाठी यांचा मृतदेह टॉयलेटमध्ये लटकलेल्या स्थितीत आढळला. ही घटना समोर येताच हॉटेलच्या प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच मुंबईतील एअरपोर्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना निशांत यांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.
पत्नीविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर निशांत त्रिपाठी यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत निशांत त्रिपाठी यांची पत्नी अपूर्वा आणि अपूर्वा यांची काकी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत निशांत यांनी आपली आई आणि भावासाठीही सुसाईडनोटमध्ये एक संदेश दिला आहे.
लवकरच होणार होता घटस्फोट, पण...
मृत निशांत यांची आई नीलम त्रिपाठी या कानपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निशांत यांची पत्नी अपूर्वा यांचा याअगोदर एक घटस्फोट झालेला आहे. निशांत आणि अपूर्वा यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील संबंध बिघडले होते. त्यांचा लवकरच घटस्फोटही होणार होता. मात्र त्याआधीच निशांत यांनी आत्महत्या केली आहे.
हेही वाचा :
Sonali Bendre : परमसुंदरी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा व्हायरल लूक; फोटो पाहाचं!
मॉडेल, क्लासिकल डान्सर...तेजस्वी सूर्या यांच्याशी लगीनगाठ बांधणारी शिवश्री स्कंदप्रसाद कोण आहे?



















