Wardha Crime : चाकुचा धाक दाखवुन प्रवाशाला लुटले , ऑटोचालकासह एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Wardha Crime : रिक्षाचालक आणि त्याचा सोबती यांनी चाकूचा काढून धाक दाखवत सोन्याच्या अंगठी आणि पैसे घेतले.
वर्धा : दिवसा ढवळ्या आणि रात्रीही चाकुच्या धाकानं (Knife attack threat) नागरिकांना लुटणाऱ्या व्यक्तीला वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत गिरीश तिवारी (28) हा युवक अकोल्याहून वर्ध्यात आला होता. त्याला हिंगणघाट येथे जायचे होते. 28 मे ला रात्री 10.00 वाजता हिंगणघाट येथे सासुरवाडी येथे जाण्यासाठी त्याला बस, रेल्वे, वाहनचउपलब्ध होईना त्यामुळे त्याने नाईलाजाने वर्धा रेल्वे स्टेशनसमोर एक रिक्षा बुक केली. त्या दरम्यान प्रवाशाला एकटा बघून रिक्षाचालक आणि त्याचा एक मित्र असे दोन आरोपी प्रवाशाजवळ आले. रिक्षाचालक आणि त्याचा सोबती यांनी चाकूचा काढून धाक दाखवत सोन्याच्या अंगठी आणि पैसे घेतले. त्यानंतर प्रवासी श्रीकांत याने शहर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अवळल्या दोन चोरट्यांचा मुसक्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये विक्की बाबुलाल सोंळकी वय (26) रा. इतवारा बजार वर्धा आणि सुरज सुमेरसिंग गिरी वय (19) रा. हटटी पोस्ट फुपटा ता.मानोरा जि.वाशिम या आरोपींना ताब्यात घेऊन कसून विचारपूस करत पोलिसी हिसका दाखवला तेव्हा पोलिसांनी गुन्हा कबूल केला. आरोपींकडून गुन्हयात वापरलेला एक रिक्षा किंमत 82,000 आणि नगदी 1000 रूपये तसेच एक सोन्याची आंगठी अंदाजे की 22,000 रूपये तसेच चाकू किंमत 300 रूपये असा एकूण 1,05,300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लुटमार करणाऱ्या अज्ञात आरोपीचा यशस्वीरित्या शोध घेत अटक करून मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास कार्यवाही पोलीस उपनिरिक्षक सलाम कुरेशी करीत आहे.
संबंधित बातम्या :