एक्स्प्लोर

Nagpur : ओडिशातून यायचा... नागपुरात चोरी करायचा... 16 ठिकाणी चोरी करणाऱ्या 'प्रवासी' चोराला नागपूर पोलिसांच्या बेड्या

Nagpur Crime : ओडिसामधील गंजम आणि भुवनेश्वर जिल्ह्यात तसेच छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्येही अनेक घरफोड्या केलेल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 971 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

नागपूर : ओडिसातून ट्रेनने नागपुरात येऊन चोरी करून परत इतर राज्यात ऐशोआरमात जीवन जगणाऱ्या एका सराईत चोराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रशांत कुमार कराड असे या चोराचे नाव असून प्रशांत कराडच्या नेतृत्वात चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीने नागपुरात एक दोन नाही तर तब्बल 16 ठिकाणी चोऱ्या केल्याचं उघड झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रशांत आणि त्याच्या टोळीने चोऱ्या केल्या आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून नागपुरच्या प्रतापनगर, बेलतरोडी, जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. घरात लोक झोपले असताना देखील चोरीच्या घटना घडत असल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. चोरी आणि घरफोडीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पोलिसांवर देखील चोराला लवकर जेरबंद करण्याचे दबाव वाढला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही पोलीस चोरट्यांना जेरबंद करण्यात हतबल ठरत होते. 

कसा लागला सराईत चोर पोलिसांच्या हाती?

 काही दिवसांपूर्वी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिपाली पातोडे यांनी चोरीची आणखी एक तक्रार दाखल केली. त्याचा तपास करत असताना रात्रीच्या वेळी त्रिमूर्ती नगर परिसरात एका घरात चोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराभोवती शोध सुरू केला असता घरातून पळून जाताना एक संशयास्पद इसम पोलिसांच्या नजरेस पडला.  त्याला पकडून पोलिसांनी विचारपूस केली असतां तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने स्वतःचे नाव प्रशांत कुमार कराड असे सांगत चोरीची कबुली दिली. 

प्रशांत कराड मूळचा ओडिसामधील गंजम जिल्ह्यातला राहणारा असून तो रेल्वेने ओडिसामधून नागपुरात यायचा. रात्री उशिरा तो मनीष नगर, बेलतरोडी प्रताप नगर, त्रिमुर्ती नगर, स्वावलंबी नगर या परिसरात मोठ्या बंगल्यांमध्ये  चोऱ्या करायचा.  त्यानंतर प्रशांत पहाटे पुन्हा रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेने महाराष्ट्राच्या बाहेर निघून जायचा.

कुठे केल्या चोऱ्या?

पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कराड याने नागपुरात तब्बल सोळा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय त्याने ओडिसामधील गंजम आणि भुवनेश्वर जिल्ह्यात तसेच छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्येही अनेक घरफोड्या केलेल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 971 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

प्रशांत कराड हा सगळ्या चोऱ्या एकटाच करत असल्याने आजवर त्याची कोणतीही माहिती महाराष्ट्रातील पोलिसांकडे नव्हती. त्याच्या श्रीकांत शेट्टी नावाच्या एका सहकाऱ्याने चोरलेल्या मुद्देमालामधून सोन्याचे दागिने विकण्यास मदत करायचा. प्रशांत कराड घरफोडी करून चोरलेल्या मुद्देमालातून सोन्याचे दागिने श्रीकांत शेट्टीच्या हवाली करायचा आणि त्यानंतर शेट्टी त्यास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन विकायचा. सोने विकून मिळणाऱ्या रकमेतून दोघे रायपूरमधील एका चांगल्या कॉलनीत घर भाड्याने घेऊन आरामाची जिंदगी जगत होते. प्रत्येक मोठ्या चोरीनंतर महागडी दारू, मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पंचपक्वान्न खाण्याची दोघांची जीवनपद्धती होती.
पोलिसांनी प्रशांत कडून 971 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षाZero Hour | Gaja Marne वर चौथ्यांदा मोक्का, मारणेवर आधीपासून राजकीय वरदहस्त?Zero Hour Latur Mahapalika Mahamudde | 14 वर्षानंतरही लातूर महापालिकेच्या जमाखर्चाचा ताळमेळ बसेनाWorld Fatafat Superfast News | वर्ल्ड फटाफट सुपरफास्ट बातम्या | Superfast News | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget