Madha Crime News : विवाहित महिलेला फसवून हॉटेलमध्ये नेलं; बळजबरीने नको ते कृत्य, माढ्यातील खळबळजनक प्रकार
Madha Crime News : सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Madha Crime News : सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात माढ्यातील (Madha Crime News) एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार (Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तर या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात पंडित वसंत गोरे (रा. अंतरगाव, ता. भूम, जि. धाराशिव) या आरोपीविरुद्ध बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
Madha Crime News : आरोपीविरुद्ध बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्यातील डॉक्टर अत्याच्याराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असून स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डॉक्टरांच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्यासाठी तपास यंत्रणा हालचाली करत असताना, जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि जनतेच्या भावना उफाळून आल्या आहेत. अशातच माढ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात माढ्यातील एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करणे हे पोलिसांच्या पुढचं आव्हान असणार आहे.
Borivali Crime : पबमधल्या पार्टीनंतर वाद, मित्रानेच तरुणीला कराच्या बोनटवरून फरफटत नेले
बोरिवली (Borivali) पश्चिमेत पबमधील पार्टीनंतर (Party) तरुण-तरुणींमध्ये वाद झाला, ज्याचे पर्यवसान एका भीषण अपघातात झाले. याप्रकरणी पोलिसांनी विनित (Vinit) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. 'वादानंतर बोनटवर बसलेल्या तरुणीला तसंच पुढे नेलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय'. पबमधून परतत असताना झालेल्या वादानंतर तरुणी गाडीच्या बोनेटवर बसली. मित्र विनितने गाडी तशीच पुढे नेल्याने तरुणी खाली पडून गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बोरिवली पोलिसांनी (Borivali Police) या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, या घटनेची दृश्येही आता समोर आली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या


















