मुलानंच संपवलं 75 वर्षीय जन्मादात्या बापाल, धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्याच्या वादातून मुलाने 75 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon Crime News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्याच्या वादातून मुलाने 75 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान कोळी असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. तर छगन यादव कोळी असे मयत वृद्ध वडिलांचे नाव आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर इथं ही घटना घडली आहे.
समाधान याने वडील छगन कोळी यांच्या पोटावर विळ्याने गंभीर वार केले होते. दारु पिऊन घरी आलेल्या मुलासोबत वडिलांचा वाद झाला होता. गंभीर जखमी वडिलांचा जळगाव शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दारु पिऊन घरी आलेल्या समाधानसोबत झालेला वाद विकोपाला गेला आणि संतप्त अवस्थेत त्याने वडिलांच्या पोटावर विळ्याने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत छगन कोळी यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:























