भिवंडीतील एमआयएम शहाराध्यक्षाच्या अडचणीत वाढ ; बलात्काराच्या गुन्ह्यात पुन्हा अटक
एमआयएम पार्टीचे शहराध्यक्ष खालिद शेख उर्फ खालिद गुड्डू याला काही दिवसांपूर्वी खंडणी घेताना अटक करण्यात आली होती. खंडणीच्या गुन्हात 40 दिवसांच्या पेरोलवर बाहेर असणाऱ्या खालिद गुड्डूला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. 38वर्षीय माहिलेने गुड्डू यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी : शहरात इमारत बांधकाम व्यासायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना एमआयएम पार्टीचे शहराध्यक्ष खालिद शेख उर्फ खालिद गुड्डू याला अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकासह ठाणे गुन्हे शाखेने 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री गुड्डू यांच्या समदनगर येथील बंगल्यावर व्यावसायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी स्विकारताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर खंडणीचे सुमारे आठ गुन्हे दाखल झाले होते. तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर चाळीस दिवसांच्या पे रोलवर खालिद गुड्डू याची सुटका झाली होती. दरम्यान त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. अशातच एका 38वर्षीय माहिलेने गुड्डू यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा या महिलेनं शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यासह आता खालिद शेख उर्फ खालिद गुड्डू याच्यावर दाखल करण्यात आलेला हा नववा बलात्काराचा गुन्हा आहे. आणि गुन्हा दाखल होताच शनिवारी खालिद गुड्डू यास पोलोसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान खालिद गुड्डू यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने आणि आकसा पोटी होत असल्याचा आरोप करीत खालिद गुड्डू याच्या परिवारासह एमआयएमचे शेकडो कार्यकर्त्यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर एकत्र जमत खालिद गुड्डू यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करा आणि खालिद गुड्डू याची सुटका करा अशा घोषणा दिल्या.
त्याचदरम्यान भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण कार्यालयासमोर आले असता जमावाने त्यांना घेराव घालत खालिद गुड्डू याच्या सुटकेची मागणी केली. काही काळ पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर पोलीस आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यालाबाहेर अतिरिक्त वाढीव कुमक आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवले. काही काळ परिसराला छावणीचे रूप आले होते. त्यानंतर एमआयएमच्या शिष्ठमंडळाने खालिद गुड्डू संदर्भातील मागण्यांचे निवेदन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्याकडे सोपवले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :