एक्स्प्लोर

भावनिक कारणं सांगून देशातील विविध विमानतळावर लोकांकडून पैसा उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोडेला वेंकट दिनेशकुमारने दिल्ली,बेंगलोर,चेन्नई, मुंबई अशा विविध विमानतळावर लोकांकडून खोटी कारण सांगून पैसे उकळले आहेत.

 मुंबई : भारताच्या विविध विमानतळावर कधी आई आजारी आहे तर कधी वडील आजारी आहेत तर कधी आपल्या अमुख ठिकाणी जायचं आहे मात्र सामान चोरल्यामुळे तिकीट आणि पैसे नाही असे सांगून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. या तरुण आरोपीचे नाव मोडेल वेंकटेश दिनेशकुमार (वय 22 )असून मोडेल वेंकट हा आंध्र प्रदेश येथील गुंटूरचा राहणार आहे. विमानतळावर भावनिक कारणं सांगून लोकांकडून तो पैसे घ्यायचा आणि घरी गेल्यावर पैसे परत देतो असे सांगायचा.  मात्र पैसे मागण्यासाठी ही लोकं जेव्हा मोडेला वेंकटला फोन करायची तेव्हा तो त्यांची टिंगल उडवायचा तर कधी दुर्लक्षित करायचा.

मोडेला वेंकट दिनेशकुमारने दिल्ली,बेंगलोर,चेन्नई, मुंबई अशा विविध विमानतळावर लोकांकडून खोटी कारण सांगून पैसे उकळले आहेत. आई आजारी आहे ,मेडिकल कॉलेजची फी भरायची आहे, सामान टॅक्सीमध्ये विसरल्याच सांगत मोडेल वेंकटने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. साधा आणि अगदी भोळा वाटणारा मोडेल वेंकट लोकांना आपल्या गोड बोलण्यामध्ये आधी फसवायचा आणि पैसे परत करतो म्हणून सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि लंपास व्ह्याचा.

मोडेला वेंकट याच भिंग तेव्हा फुटला जेव्हा 1 जानेवारी रोजी वर्धा येथे राहणारे रघुनंदन ठाकरे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूरला जात होते. त्यावेळी मोडेल वेंकट त्यांच्या जवळ आला आणि त्याने रघुनंदन यांना सांगितलं की त्याला परीक्षेसाठी चंदीगडला जायचं आहे आणि त्याची फ्लाईट चुकली असून त्याला दुसर तिकिट काढण्यासाठी 7500 रुपयांची गरज आहे. माणुसकीच्या नात्याने ठाकरे यांनी 7,500 रु मोडेला वेकटला दिले.काही दिवसांनी जेव्हा ठाकरे यांनी आपले पैसे मागण्यासाठी मोडेल वेंकटला फोन केला तेव्हा तो ठाकरे यांची टिंगल करू लागला आणि ठाकरे यांच्या आपली फसवणूक झाल्याचं लक्ष्यात येण्यास वेळ नाही लागला.

16 जूनला जेव्हा रघुनंदन ठाकरे प्रवासाकरीता मुंबई विमानतळावर गेले तेव्हा त्यांनी बॅकेज बेल्ट जवळ एका व्यक्तील संशयस्पद हालचाली करताना पाहिलं. ठाकरे यांनी जेव्हा लक्ष देऊन त्या व्यक्तीला पाहिलं तर तो मोडेल वेंकट होता ज्याने काही दिवसांपूर्वी त्यांची फसवणूक केली होती. ठाकरे यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि क्षणाचा ही विलंब न करता पोलीस त्या ठिकाणी पोहचले. मोडेल वेंकट याची ओळख करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले...

चौकशी मध्ये समोर आलं की मोडेल वेंकट हा सराईत गुन्हेगार असून देशाच्या विविध विमानतळावर त्याने अशी खोटी कारण सांगून 13 व्यक्तींची फसवणूक केली असून त्यांच्या कडून 1 लाख 73 हजार 367 रुपये लुबाडले आहेत. लोकांना फासवलेल्याची संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून पोलिसांनी लोकांना आव्हान केलं आहे की ज्या कोणाची अशी फसवणूक झाली असेल त्याने पोलिसांशी संपर्क साधावा.

मंजुनाथ शिंघे परिमंडळ 8 पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर सिल्वटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहार पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती नलावडे,पोलीस शिपाई संदीप पवार आणि हेमराज पाटील या पथका कडून हा तपास करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget