Prevent Cyber Blackmailing : सायबर गुन्ह्यातून फसवणूक, लैगिंक शोषण करण्याचं प्रमाण वाढलं, वाचण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा, मुंबई पोलिसांचं आवाहन
Cyber Crimes : सध्या आपल्या सभोवताली वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांतून वाचण्यासाठी काही टीप्स आपण फॉलो करणं गरजेचं झालं आहे, मुंबई पोलिसांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Prevent Sextortion and Cyber Blackmailing : अलीकडे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनीक उपकरणांचा वाढता वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहेत. सर्वकाही डिजीटल होत असल्याने सायबर गुन्हेही वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं झालं असून याप्रकारच्या सायबर फसवणूक आणि लैंगिक शोषणातून वाचण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ...
खालील टीप्स फॉलो करा आणि सायबर फसवणूक, लैगिंक शोषणापासून वाचा -
- कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका.
- कोणत्याही अनोळखी नंबरवरुन आलेले व्हिडीओ कॉल उचलू नका.
- आपले खाजगी फोटोज सोशल मीडियावर शेअर करु नका.
- ऑनलाईन चॅटिंग करताना खाजगी प्रकरणांवर बोलणं टाळा.
- धमकी देणारे ईमेल डिलीट न करता पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यासाठी ते तसेच ठेवा.
- आपली खाजगी माहिती जसंकी घरचा पत्ता, फोन नंबर,ईमेल अॅड्रेस हे सारं ऑनलाईन सोशल मीडियावर शेअर करु नका.
- आपले खाजगी पासवर्ड कुठेही शेअर करु नका.
- प्रायव्हसी सेटिंग जसेकी पासवर्ड कायम कठीण ठेवा, जेणेकरुन ते हॅक करता येणार नाहीत.
- कोणतेही फोटो पोस्ट करताना विचारपूर्वक करा.
- कोणीही चूकीचे किंवा संशयास्पद मेसेज पाठवत असल्याच त्याला त्वरीत ब्लॉक करुव रिपोर्ट करा.
- अनोळखी अॅड्रेसवरुन आलेले ईमेल ओपन करु नका, त्यात व्हायरस असण्याची शक्यता आहे.
तर वरील ज्या काही टीप्स मुंबई पोलिसांनी शेअर केल्या आहेत, त्या पाळणं अत्यंत सोपं असल्याने आपण सर्वजण या नक्कीच फॉलो करु शकतो. तसंच कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास पोलिसांशी संपर्क साधणंही तितकच महत्त्वाचं आहे. हे सर्व करुन आपण सायबर गुन्ह्यांना नक्कीच आळा घालू शकतो.
हे देखील वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
