एक्स्प्लोर

Aurangabad: स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवायचा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Aurangabad News: पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी तत्काळ सायबर पोलिसांना वेगाने तपास करण्याच्या सुचना केल्या. त्यांनतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Aurangabad Crime News: रस्त्यावर सापडलेल्या सीम कार्डच्या नंबरचा वापर करून, एका माथेफिरू तरुणाने स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात हा सर्व प्रकार घडला आहे. सायबर पोलिसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाने ह्या घटनेचा खुलासा झाला आहे. अभिषेक अशोक वाघ (20, रा. शिवना, सिल्लोड)  असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणाने औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलिसांकडे आपल्या नावाच्या सिमकार्डचा नंबर वापरून कोणीतरी व्हॉटस्ॲपचा वापर करत असल्याची तक्रार दिली होती. विशेष म्हणजे या नंबरवरून गावातील महिलांना अश्लील फोटो सुद्धा पाठवले जात असल्याची माहिती या तरुणाने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे यामुळे गावात जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता सुद्धा तरुणाने वर्तवली. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेत सायबर पोलिसांनी याची माहिती थेट पोलीस अधीक्षक यांना दिली.

पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी तत्काळ सायबर पोलिसांना वेगाने तपास करण्याच्या सुचना केल्या. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तब्बल आठ दिवस सायबर पोलिसांनी त्या नंबरबाबत सर्व माहिती गोळा केली. पुढे पोलिसांच्या तपासात अभिषेक चे नाव समोर आले. त्यांनतर पोलिसांनी सापळा रचुन साध्या वेशात त्याचे घर गाठले. तेव्हा अभिषेक परिसरातील एका किराणा दुकानावर उभा होता. तेथेच त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

असा अडकला...

अभिषेकला काही दिवसांपुर्वी ते सीम कार्ड बसस्थानकावर सापडले. त्याने आधी स्वत:च्या मोबाईल मध्ये तो सिमकार्ड टाकून त्याचा क्रमांक जाणुन घेतला. त्यानंतर लहान बहिणीला मोबाईलची कामासाठी गरज असल्याचे सांगून तीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. त्यावर त्या क्रमांकाने व्हॉटस्ॲप इंस्टॉल करुन विकृत प्रकार सुरू केले.  मात्र सुरवातीला नंबर जाणून घेण्यासाठी त्याने सिमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकला आणि तिथेच फसला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे अभिषेकवर जालना पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल असून, तेथील पोलीस सुद्धा त्याला तपासाठी ताब्यात घेऊ शकतात. 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
G. Srikant Pattern: मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी सरकारचं मोठं पाऊल; राज्यभरात जी. श्रीकांत पॅटर्न लागू होणार?
मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी सरकारचं मोठं पाऊल; राज्यभरात जी. श्रीकांत पॅटर्न लागू होणार?

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Embed widget