एक्स्प्लोर

बनावट चेक, सह्यांचा वापर, शिक्षण विभागाचे 47 लाख लंपास; मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बचत खात्यातून दिनांक ०२/०३/२०२४ रोजी एकूण १० बनावट धनादेशाद्वारे दोन अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी करून एकूण रक्कम रू. ४७,६०,०००/- काढण्यात आली आहे.

मुंबई : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे (Police) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे.
बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे याबाबतची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. या १० बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेली रक्कम 47 लाख 60 हजार रुपये (रु. 47,60,000/-) आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये 24 एप्रिल 2024 रोजी जमा करुन भरपाई केली आहे.

राज्यातील दर्जेदार खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण / परदेशी क्रीडा साहित्य आयात करणे / आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाण्यासाठी खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणे इ, करिता अर्थसहाय्य राज्य क्रीडा विकास निधीतून करण्यात येते. त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य क्रीडा विकास निधीचे बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई या शाखेत कार्यरत आहे. कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे बचत खाते, सह संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व उप सचिव / सह सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त नावाऐवजी केवळ उप सचिव (क्रीडा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या स्वाक्षरीने कार्यान्वित करण्याचे शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखा यांना 03 सप्टेंबर 2020 व 30 मे 2022 च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. कोविडचा प्रादूर्भाव सुरु झाल्यापासून, या खात्यातून धनादेशाऐवजी आर.टी.जी.एस मार्फत व्यवहार करण्यात आले असून कोणत्याही खेळाडूस/संस्थेस धनादेश देण्यात आलेले नाहीत.

बचत खात्यातून 2 मार्च 2024 रोजी एकूण 10 बनावट धनादेशाद्वारे दोन अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी करून एकूण रक्कम 47,60,000 काढण्यात आली आहे. ही बाब बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंत्रालय शाखेच्या अधिकाऱ्यांच्या तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या 04 मार्च 2024 रोजी निदर्शनास आली. या धनादेशाच्या मूळ प्रती विभागातच उपलब्ध असल्याने हे धनादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या धनादेशांच्या फोटोप्रतींचे अवलोकन केले असता, ते महाराष्ट्र राज्याबाहेरील कोलकाता व चेन्नई या शहरांतील वेगेवेगळ्या बँकेमध्ये वटल्याचे व या धनादेशांवर दोन अधिकाऱ्यांच्या बनावट संयुक्त स्वाक्षऱ्या असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा

कोयत्याने वार करुन महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला संपवलं, 570 रुपयाच्या बिलासाठी 1 वर्षाचं बाळ पोरकं झालं!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget