Crime News : डोंबिवली हादरलं! घरातील सोफ्यात आढळला महिलेचा मृतदेह
Crime News : घरातील सोफ्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.
Crime News : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ठेवला असल्याचे समोर आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डोंबिवलीतील दावडी गावात ही घटना घडली.
सुप्रिया शिंदे असे या मृत महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारत आहे. किशोर शिंदे हे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आपल्या मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी, किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. त्यावेळी सुप्रिया या घरात नव्हत्या. त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांकडे तिची विचारपूस केली. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक शिंदे यांच्या घरी आले. त्यांना घरातील सोफा अस्ताव्यसत दिसून आला. त्यांना याचा संशय आल्याने त्यांनी सोफा उघडून पाहिला त्यावेळी त्यांना धक्का बसला.
घरातील सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. सुप्रिया हीची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती समजताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. सुप्रिया शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. सुप्रियासोबत काही गैरप्रकार झाला आहे का, हत्या का झाली असावी याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.'
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Chandrapur News : शिकाऱ्याचीच झाली शिकार; वाघ, बिबट्यांची शिकार घडवून आणणारा वनविभागाचा खबरी गजाआड
- Crime News : विनयभंग करणारा विकृत अटकेत; बाईकच्या तुटलेल्या इंडिकेटरवरून शोध
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha