Crime News : विनयभंग करणारा विकृत अटकेत; बाईकच्या तुटलेल्या इंडिकेटरवरून शोध
Crime News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेसाठी 3200 बाइकचा शोध पोलिसांनी घेतला.
Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अमन यादव अस या तरुणाचे नाव असून तो प्रयागराग विद्यापीठातील विद्यार्थी आहे. या आरोपीला त्याच्या तुटलेल्या इंडिकेटरची बाईक शोधण्यासाठी पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल 3200 बाइकच्या शोध घेतला. आरोपीने आणखीन किती मुलींसोबत हा प्रकार केला आहे याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
डोंबिवलीमधील एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने अश्लील स्पर्श केला. हा स्पर्श मुलीला जाणवताच ती घाबरली घरी धाव घेत मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो पसार झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आरोपीने टोपी घातल्याने त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नव्हता. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला.
असा लागला आरोपीचा छडा
परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. इतकेच नाही तर एके ठिकाणी तोच तरुण काही खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य करण्यासाठी आला असता त्याची ब्लॅक कलरची युनीकॉन बाईक सीसीटीव्हीत कैद झाली होती. अविनाश वनवे यांच्या पथकाने डोंबिवलीत किती जणांकडे युनीकॉन बाईक आहेत याची आरटीओकडून माहिती काढली. सुमारे दहा हजार जणांकडे अशा प्रकारची बाईक असल्याची नोंद होती त्यामध्ये त्यामध्ये ब्लॅक कलरची बाईक 3200 आहेत. त्यापैकी सोनारपाडा परिसरात 80 जणांकडे ही बाईक आहे. मात्र कोणत्या ब्लॅक कलरच्या युनिकॉन गाडीचे इंडिकेटर तुटले आहे. त्यापैकी एक गाडी पोलिसांनी शोधून काढली ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले. तर धक्कादायक प्रकार समोर आला. अमन यादाव हा प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी आहे. तो सध्या सोनारपाडा येथील आई वडिलांकडे आला आहे. दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Crime News : धक्कादायक! फोटो स्टुडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
- Odisha : पठ्ठ्यानं केलं 7 राज्यातील 14 महिलांशी लग्न ; शेवटच्या बायकोनं पकडलं अन्....
- Crime News : भाऊ झाला वैरी! 17 वर्षीय युवकाची चुलत भावाने केली हत्या
- प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha