एक्स्प्लोर

Mumbai News : जामीनाबाहेर बाहेर आलेल्या गुंडाचं मोठ्या आवाजात गाणी वाजवून, फटाके फोडून स्वागत; पुन्हा अटक

Mumbai News : जामीनावर तुरुंगातून बाहेर पडलेल्या एका गुंडाला मोठ्या आवाजात गाणी वाजवणं आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करणं महागात पडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली.

Mumbai News : जामीनावर तुरुंगातून बाहेर पडलेल्या एका गुंडाला मोठ्या आवाजात गाणी वाजवणं आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करणं महागात पडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा एकदा अटक केली. मुंबईतील (Mumbai) कुलाबा (Colaba) परिसरात 28  जुलै रोजी ही घटना घडली होती. या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 4 ऑगस्ट रोजी आरोपीसह आणि सहा जणांना अटक केली.

दरवेझ मोहम्मद सय्यद उर्फ दरवेझ भाई असं या आरोपीचं नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला आठ महिन्यांनी जामीन मिळाला आणि 28 जुलै रोजी त्याने आणि त्याच्या काही साथीदारांनी जल्लोष साजरा केला. मोठ्या आवाजात गाणी वाजवत, घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी दरवेझ हा बीएमडब्लू कारच्या सनरुफमध्ये उभं राहून हातात सिगरेट घेऊन सगळ्यांना हात हलवून दाखवत होता.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा आणि अटक
त्याच्या जवळच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड केला आणि नंतर तो व्हायरल झाला. एसबीएस रोडवरुन रॅली काढण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी शाहबाज सय्यद (वय 28 वर्षे), दिलशाद अब्दुल रशीद शेख (वय 24 वर्षे) आणि कल्लू उर्फ ​​राज (वय 21 वर्षे) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपी कुलाबा आणि कफ परेड इथले रहिवासी असल्याचं समजतं.

क्षुल्लक कारणावरुन हल्ला आणि आर्थर रोड तुरुंगात रवानगी
दरवेझ याचं कुलाबा इथे गॅरेज आहे. जल्लोषासाठी त्याने त्याच्या एका क्लायंटची बीएमडब्ल्यू कार वापरली होती. कुलाब्यात दरवेझ भाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या दरवेझ मोहम्मद सय्यदविरोधात  2021 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. क्षुल्लक कारणावरुन त्याने एका व्यक्तीवर स्क्रू डायव्हरने हल्ला केला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी जामीनावर सुटका करण्यात आली आणि 28 जुलै रोजी कुलाबा इथे त्याच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shahu Maharaj : देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे आरक्षणाचं धोरण कसं होतं? 
देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे आरक्षणाचं धोरण कसं होतं? 
Embed widget