एक्स्प्लोर

CCH Scam : सीसीएच अॅपद्वारे कोट्यवधींची फसवणूक, धुळ्यातील हजारो नागरिकांचा खिसा रिकामा 

CCH Scam : क्लाऊड मायनर ॲप अर्थात सीसीएच ॲपद्वारे धुळ्यातील नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशीच घटना काल सोलापुरात (Solapur)  देखील समोर आली आहे.

धुळे : भारतातील मोठ्या आणि प्रमुख शहरात क्लाऊड मायनर ॲप अर्थात सीसीएच ॲपद्वारे (CCH Scam) दामदुप्पट योजनांना बळी पडून हजारो लोकांची फसवणूक (Fraud) झाली आहे. या अॅपच्या माध्यमातून धुळ्यातील नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशीच घटना काल सोलापुरात (Solapur)  देखील समोर आली आहे. सोलापुरातील अनेक लोकांनी या अॅपमध्ये पैसे गुंतवले. परंतु, त्यांचे हे पैसे बुडाले आहेत. पोलिस धुळे आणि सोलापुरातील फसवणुकीच्या प्रकारांची चौकशी करत आहेत. 

सीसीएच हे अमेरिकन ॲप असून यामध्ये अनेकांनी कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली आहे.  परंतु,  मॅक्स क्रिप्टो यांचे डॉलर गेल्या दहा दिवसांपासून विड्रॉल होणे अचानक बंद झाले आहे. यामुळे सुमारे 1000 कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात धुळे जिल्ह्यातील देखील अनेक गुंतवणूकदारांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार 500 हून अधिक जणांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अनेक जण भीतीपोटी तक्रार दाखल करण्यास समोर येत नसल्याने हा आकडा अधिक असल्याचा देखील अंदाज सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

विविध ऑनलाईन अपद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या घटना आता समोर येत आहेत. सध्या धुळे आणि सोलापूरमध्ये याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सीसीएच या अमेरिकन ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ॲपचे विड्रॉल अचानक बंद झाले असून यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 

पैसे दामदुप्पट करून देण्याच्या योजनेला बळी पडून नागरिकांनी लाखो रुपये या अॅपमध्ये गुंतवले होते. मात्र, सुरुवातीला परतावा मिळाल्यानंतर अनेकांनी दुसऱ्यांदा परत पैसे गुंतवले. त्यानंतर आर्थिक पसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करता तसेच अशा योजनांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी एबीपी माझाशी बोलताना केले आहे.   
 
सोलापुरातील अनेक नागरिकांची फसवणूक
धुळ्यासारखीच घटना सोलापूरमध्ये देखील उघड झाली आहे.  सोलापुरात ऑनलाईन अॅपद्वारे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये बुडाल्याले आहेत. CCH म्हणजेच क्लाऊड मायनर अॅप या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर चक्क दाम दुप्पट होत असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली. यानंतर सोलापुरातील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

कशी होते फसवणूक?
क्लाऊड मायनर ॲप म्हणजेच CCH ही एक अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर अवघ्या काही दिवसात दाम दुप्पट करुन देत असल्याची अफवा सोलापूरकरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. या अमिषाला बळी पडून सोलापुरातील हजारो लोकांनी या अॅपमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. प्रथम पाच हजार रूपयांपासून या अॅपमध्ये गुंतवणूक सुरु झाली. अनेकांना मोठा परतावा देखील मिळाला. त्यामुळे नंतर अनेक लोकांनी गुंतवणुकीची रक्कम वाढवायला सुरुवात केली.  परंतु, गेल्या काही दिवसांपासून या अॅपमधून पैसे विड्रॉल होणे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली.  

महत्वाच्या बातम्या

Solapur CCH Scam : अॅपद्वारे पैसा दुप्पट करण्याचं आमिष, सोलापूरकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक 

Crime News: शंभूराजे देसाई यांचा पीए असल्याचे सांगून दोन लाखांना गंडा, जालन्यात गुन्हा दाखल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget