अपंग अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार, बुलढाण्यात मशिदितील मौलानाला दुहेरी आजन्म कारावासाची शिक्षा
Buldhana Crime : पीडिता आणि पिडीतेची आई सरकार पक्षाशी फितूर झाल्यावरही खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

बुलढाणा : अपंग आणि अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलढाण्यातील एका मशिदीच्या मौलवीला दुहेरी आजन्म कारावासाची शिक्षा खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील मुख्य पीडिता आणि तिची आई सरकारी पक्षाला फितुर झाल्यानंतरही न्यायालयाने इतर साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे हा निकाल दिला आहे. सय्यद नाजिम सय्यद अब्दुल कय्यूम असं दोषी मौलवीचं नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पोलिस स्थानकांतर्गत गावातील दलित समाजातील एका 14 वर्षीय बालिकेला मशिदीत बोलावून मौलानाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गुन्हा नोंदवून तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी योग्य तपास करत प्रकरण न्यायप्रविष्ठ केलं होत.
या प्रकरणी खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने 11 साक्षीदार तपासले होते. मात्र यातील पीडिता आणि पीडितेची आई या दोन्ही मुख्य साक्षीदार सरकारी पक्षाला फितूर झाल्या होत्या. तरीही न्यायालयाने इतर महत्वाच्या साक्षी नोंदवून निकाल दिला. न्यायालयाने आरोपी सय्यद नाजिम सय्यद अब्दुल कय्यूम या मशिदीत मौलाना म्हणून काम करणाऱ्या आरोपीला दुहेरी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सोळंके यांनी शिताफीने तपास केल्याने आज आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर जिल्ह्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.
न्यायालयाने या कलमांतर्गत सुनावली शिक्षा
शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश खामगाव, वैरागडे मॅडम यांनी कोर्टात सुरु असलेले अपराध नं. 275/2016, स्पेशल सेशन केस न. 08/2017 मधील आरोपी सय्यद नाजीम सय्यद अब्दुल कय्युम, वय 33 वर्ष रा. टुनकी बावनबीर, ता. संग्रामपुर यास न्यायालयाने कलम 376 (2) भादवी नुसार हा आजन्म कारावास आणि 10,000 रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अधिक शिक्षा, भादवी 506 नुसार एक वर्ष शिक्षा आणि 1,000 रु दंड आणि दंड न भरल्यास एक महिना शिक्षा, क 3(1)(w) नुसार सहा महिने शिक्षा व 1000 रु दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना शिक्षा, 3 (2) (5) नुसार आजन्म कारावास आणि 1000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
