Kalyan: इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, मग संधीचा फायदा घेऊन गुंगीचं औषध दिलं, बीडच्या आर्मी जवानाचा कल्याणमधील महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार
Kalyan Crime : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मग आरोपीने प्रेयसीच्या पेयात गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला.
![Kalyan: इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, मग संधीचा फायदा घेऊन गुंगीचं औषध दिलं, बीडच्या आर्मी जवानाचा कल्याणमधील महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार Kalyan Crime Beed Army jawan rape on ladies constable love story on Instagram marathi news Kalyan: इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, मग संधीचा फायदा घेऊन गुंगीचं औषध दिलं, बीडच्या आर्मी जवानाचा कल्याणमधील महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/26/575926abd3190ea4451a07094c19bc96168511581439793_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: 'लव्ह, प्यार और धोका' या हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच धक्कादायक घटना कल्याणमधील एका 30 वर्षीय महिला कॉन्स्टेबलच्या जीवनात घडली आहे. आर्मीत जवान असलेल्या एका 28 वर्षीय तरुणाशी पीडित महिला कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर ओळख होऊन दोघात प्रेम जुळले होते. मात्र त्यानंतर संधीचा फायदा घेऊन आर्मीत जवान असलेल्या प्रियकराने महिला कॉन्स्टेबल प्रेयसीला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आर्मीत जवान असलेल्या प्रियकरावर अत्याचारासह विविध कलमानुसार पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश घुले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव असून तो सध्या पुणे जिल्ह्यातील आर्मी कार्यालयात जवान म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल कल्याण पूर्वेत कुटूंबासह राहत असून ती मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी आकाश हा कल्याण पश्चिम भागात राहत असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
पीडित महिला कॉन्स्टेबल हिची 2021 साली इंस्टाग्रामवर आरोपी आकाशची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री होऊन आरोपीने आपण आर्मीत जवान असून तू कशी दिसते तुला मला बघायचे असे बोलून प्रेमाच्या जाळ्यात पीडितेला अडकले. त्यानंतर वर्षभर दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळल्याने त्याचे सतत मोबाईलवर बोलणं होत असे. त्यातच मे 2022 मध्ये आरोपी प्रियकर आकाश हा पीडितेच्या कल्याण पूर्वेतील घरी आला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला गुंगीकारक थंड पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. मात्र बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने प्रेमाच्या आणा भाका देऊन लग्न करण्याचे आमिष दाखवत पीडितेला शांत केले. त्यानंतर मात्र लग्नाचं आमिष दाखवून पीडितेबरोबर वर्षभर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले
एके दिवशी तर आरोपी प्रियकराने पीडितेला मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून सांगितले की, तू विवस्त्र होऊन व्हिडीओ समोर ये. जर तू नाही आलीस तर मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेन अशी धमकी देत, पीडितेला विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले. विशेष म्हणजे पीडितेच्या घरी वारंवार येऊन तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत असताना त्याच दरम्यान पीडितेला घेऊन आरोपी तिच्या मूळ गावी गेला होता. त्यावेळी पिडीतेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र त्यावेळी पीडितेला जातीचे कारण देत आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडिता बीड जिल्ह्यातील संबधित पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी आकाश विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र त्यावेळी आरोपी आकाश याने तेथील पोलिसांसमोर पीडितेशी लग्न करण्यास होकार दिल्याने पिडीतेने तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, काही दिवसापूर्वीही मी वेगळ्या जातीचा आहे, तू खालच्या जातीची असल्याचे कारण देत आरोपी प्रियकराने पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. त्यांनतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने 25 मे रोजी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आकाशवर 376 (2) (एन ) , 328 तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)