Bhandara Crime: भंडारा हादरले ! भर रस्त्यात गाठलं, सर्वांच्या देखत संपवलं, वाचवायला गेलेल्या मित्राचाही बघता बघता जीव गेला
Bhandara Crime: हल्लेखोर पसार झाल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना आजूबाजूच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात नेले .परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते .

Bhandara crime: भंडारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे .शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात गर्दीत गाठत दोन तरुणांवर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली आहे .शनिवारी (9 ऑगस्ट) तुझी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आलाय .जुन्या वैमानस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत .काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे .
या घटनेतील मृतांची ओळख पटली असून वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (30) असं दोन्ही मृतांची नावे आहेत. . हे दोघेही मुस्लिम ग्रंथालय संकुलातील रहिवासी असून शनिवारी रात्री गाडीतून खाली उतरताच पाच-सहा अज्ञात हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रोडने त्यांच्यावर हल्ला केला .
नेमके घडले काय ?
भंडारा शहरातील गजबजलेल्या मुस्लिम लायब्ररी चौकात चार-पाच हल्लेखोरांनी दोन तरुणांना धारदार शस्त्राने वार करून संपवले .पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे .मुस्लिम लायब्ररी चौक हे शहराचे मुख्य निवासी संकुल आहे .मोठ्या बाजारपेठेला जोडणारा रस्ता असल्यामुळे दिवसा उजळी तर गर्दी असतेच पण रात्रीही वर्दळ असते .
रात्री दहा वाजता मृत टिंकू खान व शशांक गजभिये मुस्लिम लायब्ररी चौकात पोहोचले असता गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी त्यांना गाठले .गाडीतून खाली उतरतात पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रॉडने दोघांवर सपासप वार केले व तिथून पसार झाले .घटना घडताना तिथे अनेक लोक होते .पण त्यांना कोणीही रोखू शकले नाही .हल्लेखोर पसार झाल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना आजूबाजूच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात नेले .परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते .या घटनेनंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आलं .घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले .पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे .या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसले असताना हल्लेखोरांशी वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे. टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद चालू होता आणि यातूनच ही हत्या घडल्याचं बोलल जातं आहे.
























