Baramati Crime: धक्कादायक! अभ्यास करत नाही म्हणून संताप, जन्मदात्यानेच घेतला नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव
Baramati : बारामती तालुक्यातील होळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात नऊ वर्षीय पियुष विजय भंडलकर या बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय.
Baramati Crime Crime : बारामती तालुक्यातील होळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात नऊ वर्षीय पियुष विजय भंडलकर या बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय. 14 जानेवारीला होळ येथील राहत्या घरी ही घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मुलगा पियुष अभ्यास करत नाही म्हणून त्याचे वडील विजय भंडलकर यांनी रागाच्या (Baramati Crime) भरात हे कृत्य केलं आहे. तसेच हत्येनंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा ही प्रयत्न केला आहे. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडवत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अभ्यास करत नाही म्हणून वडिलांचा संताप अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला जाब विचारात तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. दरम्यान, राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर जोराने आपटले. यात त्याचा मृत्य झाला. यावेळी घरात असलेली पियुष याची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.
हत्येनंतर प्रकरण दडवण्याचा प्रयत्न, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
कालांतराने पोलिसांनी या प्रकरणाची कुठलीही माहिती अथवा शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. मात्र, पोलिसांना खबऱ्याकडून या बाबत माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला. पुढे आलेल्या तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचं रहस्य उलगडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या