एक्स्प्लोर

Badlapur Case : गृहमंत्र्याचा वचक असा हवा की, त्याने नजर फिरवली तर पोलिसांच्या माना झुकल्या पाहिजेत, भास्कर जाधवांनी फडणवीसांना डिवचलं

Bhaskar Kadhav on Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.

मुंबई : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. दोन चिमुकल्यांवर शाळेत पाशवी अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनासह पोलिस प्रशासनाकडूनही हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. या घटनेला आठवडा उलटला तरी, या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्यानं पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. यानंतर मंगळवारी बदलापूरमधील जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. या प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जबाबदार धरलं आहे.

भास्कर जाधवांनी फडणवीसांना डिवचलं

शिवसेना ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून घटना घडल्या." या प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी गृह खातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री आणि गृह खात्याचं वचक नसल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

भास्कर जाधव म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काही झालं की, चारही बाजूंनी बोलायचे. देवेंद्र फडणीस यांचा अजिबात गृह खात्यावर वचक नाही, मध्यंतरी लोकसभेचे कारण सांगून ते राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं आपल्या कारकीर्दीचा भांडा फुटणार आहे. पोलिसांवर वचक नाही म्हणून पोलिसांची हिंमत वाढत आहे. त्यांना वाटतं, आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमची बाजू सावरून घेतील".

"गृहमंत्र्याचा वचक असा हवा"

नागपूर पोलीस चौकी जुगार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील परिस्थिती बघितली तर, खून, बलात्कार, दोन नंबरचे धंदे सगळ्यात जास्त नागपूरमध्ये आहेत. गृहमंत्री असा पाहिजे त्याची नुसती नजर फिरली, तरी पोलिसांच्या माना खाली झुकल्या पाहिजे. पोलिसांवर कंट्रोल नाही ठेवला तर, हे क्रूर होतील, हिंस्र होतील, रानटी होतील, पोलिसांना गृहखात्याचा दरारा पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kolkata Doctor Case : कोलकाता निर्भया प्रकरणात न्याय मागणाऱ्या अभिनेत्रीलाच बलात्काराची धमकी, मिमी चक्रवर्तीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Ajit Pawar: अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
Embed widget