बाबा सिद्दीकींच्या हत्येचा फुलप्रुफ प्लान; 65 बुलेट्स, अत्याधुनिक बनावटीची ऑस्ट्रिया आणि टर्की मेड गन
बाबा सिद्दिकींवर फायरिंग करताना बुलेट कमी पडू नये यासाठी मारेकऱ्याांना 65 बुलेट देण्यात आल्या होत्या.
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी फुलप्रुफ प्लान करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येसाठी आरोपींना एक दोन नव्हे तर 65 गोळ्या पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दिकींना मारण्यासाठी फुलप्रुफ तयारी करण्यात आली आहे. हत्येच्यावेळी शुटर्सला बुलेट्स कमी पडू नये यासाठी भरपूर बुलेट्स देण्यात आल्या होत्या. आरोपींना बंदुकीच्या 65 गोळ्या (लाईव्ह बुलेट्स) देण्यात आल्या होत्या. पोलीस सूत्रांन दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एकूण सहा गोळ्या (एम्प्टी बुलेट शेल मिळाले) चालवण्यात आल्या. गुरमेल सिंह आणि धर्मराज सिंह यांच्या दोन हत्यारे आढळली. यामध्ये एक पिस्तूल ऑस्ट्रिया मेड आणि दुसरा देसी कट्टा होता. आरोपींकडे पोलिसांना 28 गोळ्या (लाईव्ह बुलेट्स) मिळाल्या. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर तीन दिवसांनी जिथे हत्या करण्यात आली तिथे एक काळ्या रंगाची बॅग सापडली. या बॅगमध्ये एक टर्किशमेड 7.62 बोरची पिस्टल आणि 30 लाईव्ह बुलेट्स हस्तगत करण्यात आले. या बॅगमध्ये दोन आधारकार्ड देखील मिळाले.एका आधारकार्डवर सुमीत कुमार लिहिले आहे आणि त्यावर फोटो शिवकुमारचा फोटो आहे.
गोळी झाडल्यानंतर आरोपी फरार
आरोपी शिवकुमारने स्वतःच बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. त्यातील 3 गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. गोळी झाडल्यानंतरच शिवकुमार तेथून पळून गेला आणि आजूबाजूला असलेल्या गर्दीमध्ये झटकन मिसळला. तर त्याचे साथीदार धर्मराज आणि गुरमेल हे दोघेही हातात पिस्तूल पकडून तिथून पळाले, पण थोड्याच अंतरावर पोलिसांनी त्या दोघांना पकडलं. धर्मराज आणि गुरमेल यांच्याकडे पिस्तूल होते, पण दोघांनीही गोळीबार केला नाही. बाबा सिद्दीकी यांना सरकारकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याची आधी चर्चा होती. मात्र बाबा सिद्दीकी यांना वायप्लस सुरक्षा नव्हती, त्यांना नियमीत सुरक्षा होती. घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होते.
जिशान अख्तरही राज्याबाहेर पळून गेला
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपी शुभम लोणकरविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. तसेच जिशान अख्तरविरोधात लूकआऊट नोटीसची शक्यता असल्याची माहिकी विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली आहे. मुख्य आरोपी गुरूनेल सिंगच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरूनेलने भारतात न राहण्याची इच्छा जिशानला बोलून दाखवली होती. गुरूनेलला परदेशात पाठवण्याचे जिशान अख्तरने आश्वासन दिलं होतं . य दरम्यान जिशान अख्तरने गुरूनेलला सिद्दीकींच्या हत्येच्या कटात सहभागी करून घेतलं. सिद्धीकींच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यास गुरूनेलला परदेशात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं . हल्ला होण्याच्या दोन दिवसापूर्वीपासूनच शुभम भूमिगत झाला तर जिशान अख्तरही राज्याबाहेर पळून गेल्याची सूत्रांची माहिती आहे.
हे ही वाचा :