एक्स्प्लोर

Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात गुप्तचर यंत्रणा सपशेल फेल, मुंबई पोलीस दलात कुजबुज

Mumbai Crime news: बाबा सिद्दीक यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

मुंबई: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली असली तरी आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वर्तुळात एक कुजबुज सुरु असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांची हत्या हे एकप्रकारे मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे. बाबा सिद्दीकी हे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) रडारवर असू शकतात, ही गोष्टच मुंबई पोलिसांच्या लक्षात आली नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता आगामी काळात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. 

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी वांद्रे परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला (SRA) असणारा विरोध कारणीभूत असल्याची शक्यता समोर आली होती. मात्र, एसआरए योजनेवरुन असलेले वाद जीवे मारण्याची सुपारी देईपर्यंत टोकाला जाऊ शकतात का, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. तरीही ही शक्यता गृहीत धरुन पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पोलिसांकडून झिशान सिद्दीकी आणि कुटुंबीयांची चौकशी होणार

मुंबई पोलिसांकडून आता झिशान आणि सिद्दीकी कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे. बुधवारी मुंबई पोलिसांकडून झिशान यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. बाबा सिद्दीकी यांच्या जीवाला कोणाकडून धोका होता, याबद्दल सिद्दीकी कुटुंबीयांकडून माहिती घेतली जाऊ शकते. सिद्दीकी कुटुंबीयांना कोणावर संशय किंवा तक्रार असलेल तर त्यादृष्टीनेही मुंबई पोलीस तपास करतील, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मुंबई गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आणि गुप्तवार्ता विभागाला (CIU) अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय किंवा जवळच्या उद्योगपतींविषयी माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भविष्यात बिश्नोई टोळीकडून अशाप्रकारचा हल्ला नियोजित असल्यास तो टाळता येईल.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी अत्याधुनिक पिस्तुल वापरण्यात आले होते. मुंबईत इतक्या सहजप्रकारे शस्त्रे आणली जाणे, चिंतेची बाब आहे. ही बाब मुंबई पोलिसांना टिपता आली नव्हती. त्यामुळे आता मुंबईत ज्या मार्गाने अवैध पद्धतीने शस्त्रं आणली जात आहेत, त्या मार्गाचाही पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे.

बिश्नोईला मुंबई पोलिसांकडे सोपवण्यास केंद्राचा नकार

लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील साबरमती येथील तुरुंगात आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी त्याचा ताबा मागितला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. 

आणखी वाचा

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला

महत्त्वाच्या बातम्या

Accident News: ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना सापडला चक्क 27 किलो गांजा; खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Ram Purnekar Meet Devendra Fadnavis: राम पूर्णेकर आणि देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट; भेटीनंतर प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा
राम पूर्णेकर आणि देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट; भेटीनंतर प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Embed widget