एक्स्प्लोर

सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी, Zerodha ने लॉन्च केला Gold ETF, 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Zerodha Gold ETF : गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना जोखीमीपासून पूर्ण संरक्षण मिळतं. 

GOLD ETF : आजकाल गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे मोठा कल असल्याचं दिसून येतंय. जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत असताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनीही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिल्याचं दिसून येतंय. अशा परिस्थितीत Zerodha Fund House ने आपली नवीन योजना Gold ETF लाँच केली आहे. Zerodha Gold ETF योजना 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी अर्ज करण्यासाठी खुली असेल आणि ते 1 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जाईल.

सोने आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक

Zerodha Fund House ने दिलेल्या माहितीनुसार, Zerodha Gold ETF योजना ही एक ओपन-एंडेड योजना आणि कमी किमतीची ETF आहे. Zerodha Gold ETF मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करू शकतात. झिरोधा गोल्ड ईटीएफ योजनेचा मुख्य उद्देश देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीच्या कामगिरीवर आधारित परतावा निर्माण करणे हा आहे. Zerodha Gold ETF 95 ते 100 टक्के रक्कम भौतिक सोने आणि इतर सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल, तर योजनेच्या रकमेच्या 0 ते 5 टक्के रक्कम कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवली जाईल.

Zerodha Fund House चे CEO विशाल जैन यांनी Zerodha Gold ETF लाँच करताना सांगितले की, सोन्याला आर्थिक मालमत्तेचा दर्जा आहे जो महागाईच्या काळात त्याचे मूल्य आणि क्रयशक्ती टिकवून ठेवतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे आणि गुंतवणूकदारांना भौतिकदृष्ट्या सोने ठेवण्याच्या जोखमीपासून मुक्त करते. ते म्हणाले की, सोन्याचा इक्विटीशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये फारच कमी चढ-उतार दिसून येतात.

Zerodha Gold ETF च्या NFO मध्ये, गुंतवणूकदार किमान 500 रुपये आणि त्याहून अधिक गुंतवणूक करू शकतो आणि तो 100 रुपयांच्या पटीत पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर Zerodha Gold ETF ची सूची झाल्यानंतर, गोल्ड ETF थेट एक्सचेंजमधून खरेदी करता येईल. Zerodha Gold ETF चे प्रारंभिक NAV (Net Asset value) रुपये 10 प्रति युनिट असेल.

अलीकडेच, AMFI ने आपल्या डेटामध्ये म्हटले आहे की जानेवारी 2024 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये एकूण 657 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, जी डिसेंबर 2023 च्या तुलनेत 7 पट जास्त आहे. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, जानेवारीच्या अखेरीस गोल्ड फंडाच्या व्यवस्थापनाखालील एयूएम 27,778 कोटींवर पोहोचला आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Embed widget