अफवांवर विश्वास ठेवू नका, Paytm QR,साऊंडबॉक्स, कार्ड मशिन 15 मार्चनंतरही सुरु राहतील; विजय शर्मांची माहिती
अग्रगण्य पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने (Paytm) शुक्रवारी आपल्या वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. 15 मार्चनंतरही सेवा सुरु राहणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
Paytm QR : अग्रगण्य पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमने (Paytm) शुक्रवारी आपल्या वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. 15 मार्चनंतरही मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे मेड इन इंडिया क्यूआर कोड, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीनसह त्यांचे मोबाइल ॲप कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील. यासंदर्भात आरबीआयकडून पुष्टी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची यादी जारी केली आहे. यानंतर व्यापारी पेमेंट साधने अप्रभावित राहतील आणि सामान्यपणे कार्य करतील याची पुष्टी केली आहे. पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी देखील ट्वीटरवर माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
कंपनीने असे देखील जाहीर केले आहे की अखंड व्यापारी सेटलमेंट्स सुनिश्चित करण्यासाठी एस्क्रो खाते उघडून त्यांनी आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केले आहे. या व्यवस्थेमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेत पूर्वी वापरलेले नोडल खाते अखंडपणे बदलणे अपेक्षित आहे. FAQ चे अनुसरण करून कंपनीने आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी पेमेंट सेवांची सातत्य सुनिश्चित केली आहे. नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
व्यापारी भागीदारांना अखंड सेवा देण्यासाठी वचनबद्ध
पेटीएमच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अनुपालन आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून आमच्या व्यापारी भागीदारांना अखंड सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना खात्री देतो की पेटीएम ॲप आणि पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन सारखी आमची आघाडीची साधने नेहमीप्रमाणे काम करत राहतील. नोडल खाते ॲक्सिस बँकेत हलवल्याने पूर्वीप्रमाणेच अखंड व्यापारी सेटलमेंट्स सुनिश्चित होतील. आम्ही देशाच्या आर्थिक समावेशन प्रवासात लक्षणीय योगदान देऊन भारतीयांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत अअसल्याची माहिती पेटीएमच्या प्रवक्त्याने दिली आहे.
Paytm QR, Soundbox आणि EDC (कार्ड मशीन) 15 मार्चनंतरही काम करतील. त्यामुळं वापरकर्त्यांना अफवांना बळी पडू नये. पूर्वीप्रमाणेच व्यापारी सेटलमेंट सुरु ठेवण्यासाठी कंपनीने आपले नोडल खाते अॅक्सिस बँकेत (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित केले आहे. या व्यवस्थेमुळे ओसीएल पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत वापरत असलेले नोडल खाते एकसंधीपणे बदलणे अपेक्षित आहे. ओसीएलची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्विसेस लि. (पीपीएसएल) तिच्या स्थापनेपासूनच अॅक्सिस बँकेच्या सेवा वापरत आहे.
महत्वाच्या बातम्या: