19 वर्षी फेसबुकची स्थापना, 23 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश; मार्क झुकरबर्ग यांची यशोगाथा
मार्क झुकरबर्ग हे वयाच्या 23 व्या वर्षीच सर्वात तरुण अब्जाधीश (Youngest Billionaire) झाले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
Youngest Billionaire : सोशल मीडिया किंग फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे नाव सर्वांना माहितच असेल. जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींपैकी मार्क झुकरबर्ग हे एक आहेत. झुकरबर्ग यांच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल. मार्क झुकरबर्ग हे वयाच्या 23 व्या वर्षीच सर्वात तरुण अब्जाधीश (Youngest Billionaire) झाले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. आज मार्क झुकरबर्ग यांची कमाई मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षा जास्त आहे.
मार्क झुकरबर्ग जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती
मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जग जिंकलं हे. ते सध्या जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी त्यांनी 7.15 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. मुकेश अंबानी गौतम अदानी यांच्याशिवाय भारताचे रतन टाटा आणि अझीम प्रेमजीसुद्धा संपत्तीच्या बाबतीत त्यांच्यापुढे नाहीत. झुकेरबर्ग सध्या 39 वर्षांचे आहेत. फेब्रुवारी 2004 मध्ये त्यांनी फेसबुकची स्थापना केली आहे. त्यावेळी त्यांचं वय अवघं 19 वर्षांचे होते. जेव्हा ते 23 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्याचा मान मिळवला होता.
झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलरच्या पुढे
मार्क झुकेरबर्ग सध्या फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा सीईओ आहेत. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती अंदाजे 72 अब्ज डॉलरने वाढली. या वर्षी त्याने अंदाजे 7.15 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, झुकरबर्गची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.
फेसबुकची सुरुवात कशी झाली?
14 मे 1984 रोजी व्हाईट प्लेन्स, न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या झुकरबर्गने हार्वर्ड विद्यापीठातील एका खोलीत आपल्या तीन मित्रांसह फेसबुकला जन्म दिला. यानंतर, अल्पावधीतच, हे जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. त्यांनी मे 2012 मध्ये फेसबुकला सार्वजनिक कंपनी बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचा हा सर्वात मोठा टेक IPO होता. 2022 मध्ये कंपनीचा महसूल 117 अब्ज डॉलर होता. तसेच, त्याच्या मासिक वापरकर्त्यांची संख्या 3.7 अब्जांवर पोहोचली आहे.
मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये झुकेरबर्गची सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. 2004 मध्ये, त्याला उद्यम भांडवलदार पीटर थीलकडून 5 लाख डॉलरची गुंतवणूक मिळाली. यानंतर 2005 मध्ये कंपनीला फेसबुक हे नाव मिळाले. त्याच वर्षी याहूने फेसबुकला 1 बिलियन डॉलरमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली, जी झुकरबर्गने नाकारली.
मेटामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म
2014 मध्ये, कंपनीने 19 अब्ज डॉलर्समध्ये WhatsApp विकत घेण्याचा निर्णय घेतला. या मोठ्या डीलने गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले. 2021 मध्ये कंपनीचे नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म करण्यात आले. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म मेटा अंतर्गत येतात. त्यांची मार्केट कॅप 962.38 अब्ज डॉलर आहे. मेटा सध्या जगातील सातव्या क्रमांकाची कंपनी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
1400 एकर, 30 बेडरुम, 5000 फूट बंकर, झुकेरबर्ग तयार करतोय सिक्रेट घर