(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Prices At Record High : गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ, भारताने निर्यातीवर बंदी घातल्याचा परिणाम
Wheat Price Hike : युरोपीय बाजारात (European Markets) गव्हाचे दर 435 यूरो म्हणजेच 453 डॉलर प्रति टनवर पोहोचले आहेत.
Wheat Prices At Record High : गव्हाच्या निर्यातीवर भारताने निर्बंध लादल्यानंतर युरोपीय बाजारांवर (European Market) याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. युरोपीय बाजारात (European Markets) गव्हाचे दर 435 यूरो म्हणजेच 453 डॉलर प्रति टनवर पोहोचले आहेत. याआधी रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे गव्हाचे दर कडाडले होते. आता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने सशर्त बंदी घातल्यानंतर गव्हाचे दर गगनाला भिडले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये संकट वाढलं
गव्हाच्या निर्यातमध्ये युक्रेनचा 12 टक्के वाटा आहे. यावर रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे मोठा परिणाम झाला आहे. यानंतर भारताकडून गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरु होती. शेतकरी किमान आधारभूत किंमतीत (MSP) गहू विकण्याऐवजी चढ्या भावाने व्यापाऱ्यांना विकत होते. यामुळे सरकारच्या गहू खरेदीमध्ये घसरण झाली. अशा परिस्थितीमध्ये सरकारचं अन्न सुरक्षा अभियान धोक्यात आलं. त्यानंतर मार्च महिन्यातील भीषण गरमीमुळे गव्हाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. या पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
सरकारच्या परवानगीनंतरच निर्यात करता येणार
दरम्यान, सरकारने लागू केलेली ही बंदी आधी झालेल्या करारांसाठी लागू नसेल. बंदी आधी झालेले निर्यातीचे करार पूर्ण करण्यात येतील. मात्र भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची निर्यात करण्यासाठी सराकारची परवागनी घ्यावी लागेल. याशिवाय कोणत्याही देशाच्या सरकारने गव्हाची मागणी केल्यास सरकार अन्न सुरक्षा धोरण लक्षात ठेवून निर्यातीसाठी परवानगी देऊ शकते.
बंदरांवर अडकले गव्हाचे ट्रक
सरकारने गव्हाच्या निर्यातीवर अचानक निर्बंध लादल्याने कांडला, काकीनाडा बंदरावर गव्हाने भरलेले ट्रक मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे ट्रक सध्या बंदरातच उभे आहेत. या गव्हांची निर्यात होणार होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या