(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मृत्यूनंतर व्यक्तीच्या आधार कार्डचे काय करावे? ते सरकारला परत करता येते का? वाचा नेमकं काय करावं?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचे नेमके काय होते? हे आधार कार्ड शासनाला परत करता येते का? असे अनेकवेळा विचारले जाते.
मुंबई : आजघडीला आधार कार्डला फार महत्त्व आहे. प्रत्येक शासकीय किंवा खासगी कामासाठी या आधारची गरज भासतेच. शासकीय पातळीवरच्या तर प्रत्येक कामाला हे आधार लागते. बँकेच्या कर्जापासून ते गॅस कनेक्शनपर्यंत सगळीकडे हे आधार कार्ड लागते. आपल्या आधार कार्डचा दुरुपयोगही होऊ शकतो. त्यामुळे या 12 अंकी आधार नंबरची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मृत्यूनंतर आधार कार्डचे नेमके काय होते?
एखादी व्यक्ती हयात असेपर्यंत आधार कार्डची काळजी घ्यायला हवीच. मात्र संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही या आधार कार्डचा दुरुपयोग होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड सरेंडर करण्याची कोणताही व्यवस्था नाही. म्हणजेच व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड बंद करता येत नाही किंवा ते शासनाला परतही करता येत नाही. अशा स्थितीत एखादे कार्ड फक्त ब्लॉक करता येते.
आधार कार्ड ब्लॉक करण्याचा पर्याय (How to block Aadhar card)
व्यक्ती हयात नसल्यावर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ते ब्लॉक करण्याचा पर्याय आहे. हे आधार कार्ड ब्लॉक करून त्याचा होणारा संभाव्य दुरुपयोग टाळता येतो. एकदा आधार कार्ड ब्लॉक केल्यानंतर ते अन्य कोणालाही वापरता येत नाही. हेच आधारकार्ड पुन्हा वापरायचे असेल तर ते अगोदर अनब्लॉक करावे लागते.
आधार कार्ड ब्लॉक कसे करावे?
>>> आधार कार्ड ब्लॉक करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्ही घरबसल्या ते ब्लॉक करू शकतो. त्यासाठी सर्वांत अघोदर UIDAI च्या अधिकृत uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर माय आधार या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.
>>> माय आधार या ऑप्शनवर गेल्यानंतर आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवर जावे. तेथे तुम्हाला 'Lock/Unlock Biometrics' हा ऑप्शन निवडावा लागेल.
>>> या ऑप्शनवर क्लीक केल्यावर नवे पेज उघडले. त्यानंतर ब्लॉक करावयाचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकावा.
>>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
>>> ओटीपी टाकल्यानंतर बायोमेट्रिक डेटाला लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर तुमच्या सोईनुसार तुम्हाला आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करता येईल.
हेही वाचा :
क्रेडिट कार्डवरील 16 अंकी क्रमांकाचा नेमका अर्थ काय? सीव्हीव्ही नंबर काय? जाणून घ्या
या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? चार दिवसांत शेअर बाजारात मालामाल होण्याची संधी, वाचा सविस्तर...
चप्पल, बूट विकणाऱ्याकडे पैशांचं घबाड, प्राप्तिकर विभागाने जप्त केली तब्बल 40 कोटींची रोकड!