एक्स्प्लोर
पैसे ठेवा तयार! लवकरच 6 तगडे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार, मिळणार मोठा परतावा?
गेल्या काही दिवसांत अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परावा दिलेला आहे. आगामी काळात एकूण सहा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत.

ipo update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9

आगामी काळात एकूण सहा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
2/9

राजेश पॉवर सर्व्हिसेस (Rajesh Power Services) हा आयपीओ 25 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. यात 27 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 319 ते 335 रुपये आहे.
3/9

आभा पॉवर अँड स्टील लिमिटेड (Abha Power and Steel Limited) या कंपनीचा आयपीओ 27 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल.
4/9

पेक्स इकोटेक लिमिटेड (Pex Ecotech Limited) हा आयपीओ येत्या 27 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. 29 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 71 ते 73 रुपये आहे.
5/9

गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड (Ganesh Infraworld Limited) हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 29 नोव्हेंबर रोजी खुला होईल. 3 डिसेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 78 ते 83 रुपये प्रति शेअर आहे.
6/9

राजपूताना बायोडीझेल (Rajputana Biodiesel) हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 26 नोव्हेंबर रोजी खुला होईल. 28 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. त्यासाठी किंमत पट्टा 123 ते 130 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे.
7/9

अग्रवाल टगहेन्ड ग्लास इंडिया लिमिटेड (Agrawal Toughened Glass India Limited) या कंपनीचा आयपीओ 28 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 2 डिसेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 105 ते 108 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
8/9

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
9/9

image 9
Published at : 25 Nov 2024 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
