एक्स्प्लोर

LIC ची 'विमा सखी' योजना प्रत्येक महिन्याला देईल 7000 रुपये, जाणून घ्या स्किम काय आहे? अटी काय आहेत? 

केंद्र सरकारने विमा सखी योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्ववलंबी होता येईल. या योजनेसाठी महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

मुंबई : केंद्र सरकारकडून महिला सक्षमीकरासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना रांगेतल्या शेवट्या महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी कृतीकार्यक्रमही सरकारकडून राबवला जातोय. दरम्यान, सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा साखी (Bima Sakhi Yojana) नावाची योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे. महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये सोबतच कमीशन मिळू शकतं. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेतून महिलांना नेमके किती रुपये मिळू शकतात? हे जाणून घेऊ या....

विमा सखी ही एलआयसीची एक योजना आहे. फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तीन वर्षे महिलांना स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल. या काळात महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. ज्या महिलांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येईल.

विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत? 

महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित महिलेचे कमीत कमी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असायला हवे. तसेच महिलेचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असायला हवे. तीन वर्षांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल.  

विमा सखींना नेमके किती पैसे दिले जातील? 

या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना सरकारकडून स्टायपेंड दिले जाईल. या तीन वर्षाच्या काळात महिलांना दोन लाख रुपये दिले जातील. ट्रेनिंग घेणार्‍या महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 7000 रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षी 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये दिले जातील. विशेष म्हणजे यामध्ये कमीशनचा समावेश नाही. कमीशनच्या रुपात तुम्हाला मिळणारे पैसे हे वेगळे असतील.

नेमकी अट काय आहे?

पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणारे अनुक्रमे 6000 आणि 5000 रुपये मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या वर्षी तुम्ही जेवढ्या पॉलीसी काढून दिल्यात त्यापैकी साधारण 65 टक्के योजना या दुसऱ्या वर्षीही चालूच असायला हव्यात. तसे असेल तरच तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे पैसे मिळतील. तुम्हाला 
https://licindia.in/test2 या लिंकवर विमा सखी योजनेची सर्व माहिती मिळेल. 

हेही वाचा :

IPO Update : गुंतवणूकदारांना मोठी संधी, विशाल मेगा मार्ट ते मोबिक्विक, 4 बड्या आयपीओबाबत सर्वकाही, एका क्लिकवर 

Air India-Airbus Deal: मोठी बातमी, एअर इंडियानं दिली 100 विमानांची ऑर्डर, एअरबसशी करार, हवाई वाहतूक क्षेत्रात दबदबा वाढणार 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget