Air India-Airbus Deal: मोठी बातमी, एअर इंडियानं दिली 100 विमानांची ऑर्डर, एअरबसशी करार, हवाई वाहतूक क्षेत्रात दबदबा वाढणार
Air India-Airbus Deal: 2023 मध्ये एअर इंडियाने 470 विमानांच्या ऑर्डर दिल्या होता. आता नव्यानं 100 विमानांची ऑर्डर एअर इंडियानं दिली आहे.
Air India-Airbus Deal मुंबई : टाटा ग्रुपची (Tata Group) विमान वाहतूक कंपनी ग्लोबल एअरलायन्स एयर इंडिया (Air India) ने एअरबस (Airbus) नं 100 नव्या विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. कंपनीने याबाबतची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाला एअरबसकडून मिळणाऱ्या 100 विमानांमध्ये 10 वाइडबॉडी A350 आणि 90 नॅरोबॉडी A320 फॅमिली एअरक्राफ्ट ( A320 Family Aircraft) आणि A321neo चा समावेश आहे. एअर इंडियानं गेल्या वर्षी दिलेल्या 470 विमानांशिवाय ही नव्यानं 100 विमानांची ऑर्डर दिली आहे.
एअर इंडियानं एअरबसला 2023 मध्ये 250 विमानांची ऑर्डर दिली होती. त्यामध्ये A350 ची 40 विमानं आणि A320 च्या 210 विमानांचा समावेश होता. आता एअरबसला दिलेल्या ऑर्डरमधील विमानांची संख्या 350 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एअर इंडियानं एअरबसला FHS-C (Flight Hour Services-Component) म्हणून निवडलं आहे, ज्याद्वारे A350 फ्लीटच्या देखभालीची कामं केली जातील. नव्या मटेरिअल आणि मेनटेनन्स मुळं एअर इंडियाच्या सेवेत सुधारणा होणार आहे. एअरबसकडून दिल्लीत ऑन-साइट स्टॉकसह अभियांत्रिकी आणि इतर सेवा पुरवल्या जातील.
नव्या विमानांची ऑर्डर एअरबसला दिल्यानंतर टाटा सन्स आणि एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी माहिती दिली. भारतात विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे, ही जगातील इतरांच्या तुलनेत अधिक आहे. हवाई क्षेत्रात सोयी सुविधांमध्ये सुधारणा होत आहेत. युवकांच्या महत्त्वकांक्षा वेगानं जागतिक होत आहेत. यामुळं आम्हाला वाटलं की यापूर्वी दिलेल्या 470 विमानांच्या ऑर्डरमध्ये वाढ करावी. त्यामुळं आम्ही एअरबसला 100 अतिरिक्त विमानांची ऑर्डर दिली आहे. यामुळं विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी एअर इंडियाला मदत होईल. याशिवाय एअर इंडिया ही जागतिक दर्जाची कंपनी म्हणून चांगल्या सुविधा देऊ शकेल. याशिवाय भारताला जगाशी जोडण्यामध्ये देखील फायदा होईल, असं एन. चंद्रशेखरन म्हणाले.
एअर इंडियानं आतापर्यंत एअरबसला एकूण 350 विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 6 विमानं एअरबसनं एअर इंडियाला दिली आहेत. एअरबसनं सहा A350 विमानं एअर इंडियाकडे दिली आहेत. एअर इंडियानं बोइंगला 220 वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी एअरक्राफ्टच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यापैकी 35 विमानं एअर इंडियाकडे सोपवण्यात आली आहेत. बोइंगनं एअर इंडियाला अजून 185 विमानं द्यायची आहेत. एअर इंडिया ही भारतातील पहिली कंपनी आहे ज्यांच्या सेवेत एअरबस A350 असेल. या विमानात Rolls-Royce Trent XWB इंजिनसह आहे. A350 विमानांचा वापर सध्या एअर इंडियाकडून दिल्ली ते लंडन आणि न्यूयॉर्क या मार्गावर सुरु आहे.
इतर बातम्या :
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ तर चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर काय?