IPO Update : गुंतवणूकदारांना मोठी संधी, विशाल मेगा मार्ट ते मोबिक्विक, 4 बड्या आयपीओबाबत सर्वकाही, एका क्लिकवर
IPO Update : भारतीय शेअर बाजारात येत्या दोन दिवसात चार मेनबोर्ड आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या माध्यमातून गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी आहे.
मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून बड्या कंपन्यांचे आयपीओ लिस्ट होत आहेत. काही कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. आता विशाल मेगा मार्ट, साई लाईफ सायन्सेस,वन मोबिक्विक सिस्टीम्स आणि इनवेंचर्स नॉलेज सोल्यूशन्स या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.या आयपीओचे लॉट खरेदी करुन गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. आयपीओचा लॉट खरेदी करण्यासाठी बोली लावण्यापूर्वी संबंधित कंपन्यांनी सेबीकडे सादर केलेल्या डीआरएपी रिपोर्टचं वाचन देखील करणं आवश्यक आहे.
विशाल मेगा मार्टचा आयपीओ उद्यापासून खुला होत आहे. या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 190 शेअर आहेत. एका शेअरची किंमत 74-78 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटसाठी कमाल 14820 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओच्या सबस्क्रीप्शनसाठी बोली लावण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर आहे. विशाल मेगा मार्ट या आयपीओच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
साई लाईफ सायन्सेस आयपीओ
या कंपनीचा आयपीओ देखील सबस्क्राइब करण्यासाठी उद्यापासून खुला होणार आहे. या आयपीओचा एक लॉट घेण्यासाठी किमान14094 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय एका लॉटमध्ये 27 शेअर असतील. आयपीओच्या समभागांची किंमत 522 ते 549 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3042.62 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. रिटेल गुंतवणूकदार 2 लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकात.
वन मोबिक्विक सिस्टीम्स आयपीओ
फिनटेक क्षेत्रातील कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ देखील उद्यापासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.या कंपनीच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 53 शेअर जारी केले जातील. या आयपीओमध्ये किमान 14045 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या कंपनीच्या लॉटसाठी बोली लावण्याची मुदत 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान आहे. मोबिक्विक आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
इनवेंचर्स नॉलेज सोल्यूशन्स
इनवेंचर्स नॉलेज सोल्यूशन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 12 डिसेंबरला खुला होणार आहे. 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान आयपीओ सबस्क्राइब करता येईल. यासाठी किमान गुंतवणूक 13915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. इनवेंचर्स नॉलेज सोल्यूशन्सकडून आयपीओच्या 2497.92 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)