Russia India : रशियावरील निर्बंधाचा भारताला फायदा; इंधन दराबाबत लवकरच मिळणार गुड न्यूज!
India Russia : अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधाचा फायदा भारताला होण्याची दाट शक्यता आहे. भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळू शकतात.
![Russia India : रशियावरील निर्बंधाचा भारताला फायदा; इंधन दराबाबत लवकरच मिळणार गुड न्यूज! usa sanctions Russia Russia proposal to india for export crude oil in reasonable price Russia India : रशियावरील निर्बंधाचा भारताला फायदा; इंधन दराबाबत लवकरच मिळणार गुड न्यूज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/fa8cdbc08707f6b433f80e36e0fca3e3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanctions on Russia : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियावर निर्बंध लागू करत कच्चे तेल खरेदी करण्यावर बंदी घातली. रशियावरील हे निर्बंध भारताच्या पथ्यावर पडणार असल्याची चिन्हं आहेत. रशियाने भारताला कमी दरात कच्चे तेल विक्रीचा प्रस्ताव दिला आहे. भारताकडून या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता आहे. भारत रशियाकडून 35 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम इंधन दरावर होणार आहे.
या करारानुसार, भारताला कच्चे तेल देण्यात शिपींग आणि विम्याची जबाबदारी रशियाची आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यात भारतीय इंधन कंपन्यांसमोर ही अडचण होती. रशिया आणि भारतात हा करार झाल्यास भारत पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्र देशासोबत उभं राहत असल्याचे संकेत असू शकतात असे म्हटलं जात आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया एकटा पडला होता. अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी रशियावर अनेक निर्बंध लागू केले आहेत.
भारताला फायदा होणार
तेल आयातीतील एकूण २ ते ४ टक्के तेल रशियातून आयात होणार असल्याचे म्हटले जाते. भारत तेल खरेदी करताना व्यवहार रुबल-रुपयामध्ये करण्याची दाट शक्यता आहे. रुबल डाॅलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खाली घसरला आहे. भारताला ह्या तेल खरेदीतून मोठा फायदा होणार आहे. परदेशी चलन वाचणार असून सोबतच बाजार भावापेक्षा
२७ ते ३० टक्के सवलतीच्या दरात तेल खरेदी करता येणार आहे.
पेट्रोलियम मंत्र्यांनी काय म्हटलं?
पेट्रोलियन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, रशियाने भारताला स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताकडून या प्रस्तावावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंधन दर दिलासा मिळणार?
भारतात नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहचले होते. त्यामुळे इंधन दर वाढवणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता, रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होणार असल्याने इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)