एक्स्प्लोर

Russia Ukraine War: युक्रेनमधील युद्धामुळे दर मिनिटाला एक मूल होत आहे निर्वासित, 14 लाख मुलांनी इतर देशांमध्ये घेतला आश्रय

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे रशियन सैन्याच्या बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे रशियन सैन्याच्या बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या युद्धामुळे अनेक लोकांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. याच दरम्यान युनायटेड नेशन्स (UN) ने म्हटले आहे की, 24 फेब्रुवारीपासून रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून सुमारे 14 लाख मुलांनी युक्रेनमधून पलायन केले असून इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. याचा अर्थ युक्रेनमधून दर मिनिटाला एक मूल निर्वासित होत आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो मुलांसह हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युद्धामुळे आतापर्यंत 120 अब्ज डॉलरचे नुकसान 

रशियन सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, रशियन रणगाड्यांनी युक्रेनमधील वोलनोवाखा शहर उद्ध्वस्त केल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ला केला. ज्यामध्ये एक नागरिक ठार झाला. तर अनेक लोक जखमी झाले. रशियाच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत सुमारे 120 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे युक्रेनच्या उप-अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे युक्रेनने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत 13 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत.

28 लाख युक्रेन नागरिकांनी सोडला देश 

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या भीषण युद्धामुळे लाखो लोकांना देश सोडून जावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी सांगितले की, 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून युक्रेनमधून इतर देशांमध्ये आलेल्या निर्वासितांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सी UNHCR ने सांगितले की, आतापर्यंत 2,808,792 निर्वासितांनी देश सोडला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील निर्वासितांची ही सर्वात मोठी संख्या आहे.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War: रशियाही आक्रमक; कॅनडाच्या पंतप्रधानांसह 300 कॅनेडियन नागरिकांवर बंदी
Russia Ukraine War : युक्रेनमधून तीन भारतीयांची सुटका; पहिल्यांदाच रशियन सैन्याने केली मदत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द, कोर्टाचा मोठा निर्णय
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
Gujarat Maharashtra Day 2026: सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा
सातासमुद्रापार मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम; न्यू यॉर्कमध्ये 'गुजरात-महाराष्ट्र दिन' दिमाखात साजरा

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Embed widget