UPI यूजर्ससाठी महत्त्वाची अपडेट, व्यवहार फक्त 15 सेकंदात पूर्ण होणार, नव्या नियमाची 'या' तारखेपासून अंमलबजावणी
UPI Payments : यूपीआयद्वारे केली जाणारी पेमेंटस आता गतिमान होणार आहेत. नव्या नियमानुसार फक्त 15 सेकंदामध्ये पेमेंट पूर्ण होणार आहेत.

नवी दिल्ली : यूपीआय पेमेंट आता अधिक वेगवान होणार आहेत, कारण त्यामध्ये एक मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून यूनिफाइड पेमेंटस इंटरफेस सेवेला आणखी वेगवान आणि उत्कृष्ट करण्यासाठी एक खास बदल केला आहे. व्यवहाराच्या स्थितीची तपासणी करण्यासाठी पेमेंट करण्यासाठीच्या प्रतिसादाचा वेळ 30 सेकंदावरुन 15 सेकंद करण्यात आला आहे. यामुळं यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आणि पैसे स्वीकारण्याची प्रक्रिया सर्व वर्गातील ग्राहकांसाठी वेगवान आणि फायदेशीर होण्याची अपेक्षा आहे. 26 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या एनपीसीआयच्या दाव्रे सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना निर्देश देण्यात आले की 16 जून 2025 पासून नव्या प्रोसेसिंग नियमांना लागू केलं जावं. यूपीआयद्वारे दर महिन्याला 25 लाख कोटी रुपयांची डिजीटल ट्रांझॅक्शन केली जातात. त्यामुळं एनपीसीआयच्या नव्या बदलामुळं यूपीआय व्यवहाराचा वेग वाढेल.
फक्त 15 सेकंदात पेमेंट होणार
या बदलानंतर आता रिक्वेस्ट पे आणि रिस्पॉन्स पे सर्व्हिसचा प्रतिसादाचा वेळ 30 सेकंदांवरुन 15 सेकंदावर येईल.व्यवहार स्थिती तपासणे आणि व्यवहार रिव्हर्सलसाठी 10 सेकंद आणि पडताळणी अड्रेससाठी 10 सेकंद करण्यात आला आहे. या बदलाचा उद्देश यूपीआय पेमेंट प्रक्रियेत तेजी यावी हा आहे. भारतात डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या रुपात यूपीआयची लोकप्रियता वाढलेली आहे.
यूपीआयच्या आणि डिजीटल पेमेंटच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी एनपीसीआयनं बँका आणि अॅप्सना प्रतिसाद वेळेचं पालन करण्यासाठी सिस्टीम अपेडट करण्यास सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय यंत्रणा ठप्प झाली होती. 12 एप्रिलला यूपीआय ठप्प झालं होतं, तेव्हा अनेक व्यवहार अयशस्वी झाले होते. त्यावेळी यूजर्सना समस्यांना सामोरं जावं लागलंहोतं.26 मार्च, 1 एप्रिल आणि 12 एप्रिल या तीन दिवशी यूपीआय सेवा वापरताना यूजर्सना अडचणी आल्या होत्या.
नेमकं काय घडलं होतं?
यूपीआय सेवा ठप्प होण्याचं कारण एनपीसीआयनं केलेल्या तपासणीत समोर आलं होतं. चेक ट्रांझॅक्शन एपीआयवर ताण होता. काही बँकांच्या जुन्या व्यवहारांसाठी वारंवार रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. त्यामुळं सिस्टीमवर दबाव वाढला होता आणि प्रोसेसिंग मंदावली होती.
यूपीआय पेमेंटस पुरवणाऱ्यांमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे, व्हाट्स अॅप पेचा देखील समावेश आहे. याशिवाय भीम अॅपवरुन देखील सेवा पुरवली जाते.
इतर बातम्या :
























