Stock Market Closing : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 60,000 पार
Stock Market Closing : मुंबई बाजार शेअर बाजारात आज 3,759 समभागांची खरेदी-विक्री झाली. यामध्ये 2197 समभाग वाढले आणि 1387 समभाग कोसळे. 175 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी (Stock Market ) आठवड्याचा आजचा पहिला दिवस खूप चांगला गेलाय. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने (sensex) आज पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडलाय. तर बाजार बंद होताना निफ्टी 18 हजारांच्या जवळ पोहोचला होता. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 322 अंकांनी वधारून 60,115 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) 103 अंकांच्या वाढीसह 17,936 अंकांवर बंद झाला.
मुंबई बाजार शेअर बाजारात (BSE) आज 3,759 समभागांची खरेदी-विक्री झाली. यामध्ये 2197 समभाग वाढले आणि 1387 समभाग कोसळे. 175 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 429 शेअर्समध्ये अप्पर सर्किट होते, तर 203 शेअर्स लोअर सर्किटसह बंद झाले. शेअर बाजाराचे बाजार भांडवल 285.23 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
सोमवारी बाजार सुरू होतानाच तेजीसह सुरू झाला. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रातील समभाग तेजीत होते. बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मेटल्स वाढीसह बंद झाले. रिअल इस्टेट, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रांत देखील मोठी वाढ झाली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकती आज वाढ झाली.
अदानी पोर्ट्स 3.49 टक्के, टायटन कंपनी 2.22 टक्के, दिवीज लॅब 2.08 टक्के, टेक महिंद्रा 2.08 टक्के, अॅक्सिस बँक 2.06 टक्के, टाटा स्टील 1.94 टक्के वाढीसह बंद झाले. तर कोल इंडिया 2.57 टक्के, श्री सिमेंट 1.51 टक्के, एचडीएफसी 0.51 टक्के, नेस्ले 0.44 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.39 टक्के, एचडीएफसीचे शेअर्स 0.34 टक्क्यंनी घसरले.
आज बाजारात सुरू होतानाच तेजी दिसून आली. प्री-ओपन सत्रातसेन्सेक्स सुमारे 120 अंकांच्या वाढीसह 59,915 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. NSE निफ्टी 60 अंकांनी वाढून 17,890 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 60,090 अंकांच्या जवळ पोहोचला होता. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 72 अंकांनी वाढून 17,900 च्या वर व्यवहार करत होता.
महत्वाच्या बातम्या