एक्स्प्लोर

Share Market Trading : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

Share Market Trading :

Share Market Trading : लोकांचे उत्पादन वाढले की गुंतवणुकीसाठी (Investment) वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात होते. काहीजण सोनं खरेदी करत गुंतवणूक करतात, तर काहीजण बँकेत एफडी करतात. तर अनेक जण शेअर बाजार (Share Market), म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवतात. शेअर बाजार म्हटलं तर चढउतार आलाच. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना धाकधूक होत असेल तर शेअर मार्केट ट्रेडर, ट्रेनर, मेंटॉर आणि अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचे संस्थापक अवधूत साठे यांचा हा लेख तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. 
 
समृद्धी कुणाला नको असते? आपण स्वतः त्या समृद्धीचे कारण आहोत ही सुखावह प्रचिती तर अजून हवीहवीशी. होय ना? आर्थिक यशाचा पिच्छा पुरवत आपण झपाटल्यासारखे शेअर मार्केटच्या रिंगणात उतरतो आणि अनभिषिक्त राजे बनण्याची मनिषा उरी बाळगतो. सर्व काही मनाजोगते होत असल्यासारखे वाटत असते. कुठून तरी टिप्सचे SMS येत राहतात. बायकांनाही दागिन्यापेक्षा क्रिप्टो आणि बाप्यांना पार्टीपेक्षा F&O जास्त मोहक वाटू लागतात. येणारी सॅलरी अप्रेझल हंगाम कसाही असला तरी आपणच ठरवणार की नोकरीत राहणार की नवे बिग बुल बनणार. बस्स, सर्व काही सुरळीत चालले आहे, असे वाटत असतानाच असे काही घडते की... सस्पेंस आहे. ह्या सस्पेंस स्टोरीमधील नायक-नायिका आपण असाल तर, गुड न्यूज ही की आपण स्वतः ह्या स्टोरीचा क्लायमॅक्स ठरवू शकता. अजूनही. मी आणि माझी मनी स्टोरी विथ स्टॉक मार्केट.
 
शेअर मार्केटमधल्या अनेक संधी खुणावत असताना स्वस्थ बसून राहणे कसे शक्य आहे? जरुर उतरा, पण खाच खळगे, गतिरोधक, धोक्याची घंटा आणि भांडवल किती आणि कसे गुंतवावे याची सीमारेषा ओळखूनच. शेअर मार्केटला झटपट श्रीमंतीचा मार्ग समजून ह्यात उतरु नये. किंवा जुगार समजू नये. तो जुगार नक्कीच नाही परंतु गुंतवणूकदार, इन्वेस्टर्स, किंवा ट्रेडर एखाद्या जुगाऱ्याप्रमाणे वर्तणूक करु शकतात. अटी शर्ती, विपरित परिणामांची शक्यता, आर्थिक नुकसानीमुळे मानसिक स्थैर्य डळमळीत होणे, याही बाजू नाकारता येत नाहीत, याची जाणीव असू द्या.

रास्त महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा
आपल्या महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा रास्त असू द्यात. अपेक्षाभंग डोईजड होईल इतकी जास्त गुंतवणूक होऊ देऊ नका. कोणत्याही गोष्टीच्या वृद्धीसाठी इतर साधनांसह वेळही महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन कालावधी ठरवा. शेअर बाजारामध्ये फक्त पैशांचीच गुंतवणूक होत नसते, तर वेळ, बुद्धी, योग्य स्टॉकची निवड करता यावी यासाठी मनाची एकाग्रता, मोह टाळण्याची क्षमता, या सर्वांचीच गुंतवणूक होत असते. पैसा पैशाला ओढतो, आपण गृहित धरुन चालतो, पण कुणाचा पैसा कुणाच्या खिशात, हाही एक मजेदार विषय आहेच ना? कौशल्य महत्त्वाचे. मूलभूत म्हणजेच बेसिक संकल्पना आधीच शिकून घ्या. त्यांचा नियमित सराव करा. नाहीतर फर्स्ट सेकंड गियरची प्रॅक्टिस टाळून थेट टॉप गियरमध्ये शिरण्यासारखे होईल. 

कर्ज काढून इन्व्हेस्ट करणे टाळा
जास्तीचे, शिलकीला ठेवलेले पैसेच गुंतवणुकीसाठी वापरा. कर्ज काढून इन्व्हेस्ट करणे टाळा. उसनवारीचे दिवस तसे कुणावरही येऊ नयेत. नातेसंबंध दुरावतात, अपेक्षित रिटर्न्स मिळाले नाहीत तर आत्मविश्वास खालावतो, तो पुन्हा कशाच्या बळावर मिळवणार व दुणावणार हेही कळत नाही. कर्ज काढून शेअर मार्केट गुंतवणूक काय किंवा कर्ज काढून दिवाळी साजरी करणे काय, दुष्टचक्र आहे हे. ह्यात पडू नका. 

अंधानुकरण टाळा, डायव्हर्सिफाय करा
हर्ड मेन्टॅलिटी म्हणजे जिथे लोकांचा जत्था जातोय तिथे फार विश्लेषण न करता वळणे हे अंधानुकरण नाही तर काय? मार्केटमध्ये मोठमोठ्या असामींचा पैसा लागलेला असतो. हजारो कोटींचा प्रश्न जिथे उद्भवतो तिथे रिटेल इन्वेस्टर्सचे पैसे, एन्ट्री एक्झिटचे निर्णय, अफाट नफ्याची आस, किती वेळ तग धरुन असतील? म्हणूनच, आधी म्हटल्याप्रमाणे, पण कुणाचा पैसा कुणाच्या खिशात? शेअर मार्केटमध्ये, विशेषतः फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये असे म्हटले जाते की मनी फ्लोझ फ्रॉम लूझर्स पॉकेट्स तो विनर्स! आपल्यासाठी संधीचा महासागर खुला आहे पण आधी तरंगायला, पोहायला शिकावं. हळूहळू. सातत्याने. रोज. शेतकरीही एकाच जमिनीवर वर्षभर वेगवेगळे पीक घेत असतो. म्हातारी आजी सुद्धा फडताळात वेगवेगळ्या डब्यात नोटा लपवून ठेवायची. एकाच बटव्यात नाही! सारांश असा की डायव्हर्सिफाय करा. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या तगड्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा. अर्थात अभ्यास करुनच. सराव, शिस्त म्हणजे रिटर्न्स मस्त. नुसते ऐकण्यात मजा नाही. करुन बघा. 

'सिद्ध' करण्याच्या फंदात पडू नका
भावनांच्या आहारी जाऊ नका. पण कोणत्या भावना? मोह, लोभ, भीती आणि दंभ/अभिमान किंवा फाजील आत्मविश्वास. कुणाला तरी काही तरी सिद्ध करुन दाखवायचे आहे ही वरचढ होण्याची फोल कल्पना. का? आपले पैसे, आपले आयुष्य, आपले निर्णय, आपल्या पैशांचा आपला उपभोग. इथे इतर कुणाला जमेत धरण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण तरीही बरेच लोक हे 'सिद्ध' करण्याच्या फंदात पडतात, घाई करतात, आणि आपले भांडवल भुईसपाट करतात. 

नोकरी करुन (जिथे एक दरमहा ठराविक आवक निश्चित आहे) जर तुम्हाला ट्रेडिंग करणे जमत नसेल तर नोकरी सोडून ते जमेल हा अजून एक गोड गैरसमज. ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला आवश्यक अशी राशी मिळत नसेल किंवा नुकसान पदरी पडत असेल तर नकारात्मक भावनांना आपण बळी पडण्याची शक्यता जास्त. म्हणून शेअर मार्केटचे अनुमान लावण्यापेक्षा आपले मनोधैर्य किती आहे ह्याचे ओळख करुन घेणे श्रेयस्कर आहे. शेअर ट्रेडिंग ही तपस्या आहे आणि संयम हा त्या तपस्येचा पाया आहे. 

नियोजन करणं आवश्यक
मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तजवीज, रिटायरमेंटची सोय, घर, गाडी, वेकेशन्स, आरोग्य, हॉस्पिटलायझेशन यासाठी तरतूद आणि तत्सम कारणे जी तुम्हाला शेअर मार्केटकडे आकर्षित करतात त्या सर्वांच्या पूर्तीसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. एक्सचेंजवरील स्टॉक्स घ्यावेत, डेरीवेटिव्ह मार्केट्सच्या संधी जोखून पाहाव्यात; एन्ट्री, एक्झिट, मार्केट कोणत्या दिशेने जाईल हे ओळखून करावे. सभोवताली घडत असलेल्या सामाजिक, राजकीय घटनांचे आपल्या गुंतवलेल्या पैशांशी आणि त्याच्या वृद्धीशी काही धागेदोरे आहेत का हे समजून घेण्याची तृष्णा, जिज्ञासा असणेही चांगलेच आहे.

भ्रामक गोष्टींना भुलू नका
शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय आहे, पारंगत व्यावसायिकासारखा करावा. व्यवसायामध्ये ऑडिट, निर्बंध आणि निर्णय-परिणामांचे उत्तरदायित्व महत्त्वाचे. कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एखादी अशी व्यक्ती असू द्या जिला आपण उत्तर देणे बंधनकारक असेल. जेणेकरुन आपण ट्रॅकवर राहाल. असे केल्याने पारिवारिक विश्वास दृढ होतो जो पडत्या काळात धीर देतो. हा विश्वास नसल्यास आर्थिक, वैयक्तिक आयुष्यात पडझड होणे नाकारता येत नाही. मोठे नाव-ब्रँड म्हणतात त्याला. एखाद्या स्टॉकचा गाजावाजा होत आहे, नावाजलेले आहे, रिटर्न्स नक्कीच भरघोस मिळतील, ह्या भ्रामक गोष्टींना भुलू नका. टेक्निकल अनॅलिसिस म्हणून एक अस्त्र आहे. कोणता स्टॉक कसा, कुठवर जाईल हे ठरवण्यात मदतशीर. त्याचा उपयोग करुन आपले पैसे वाचवा, आणि वाढवा. 

अनुभवी मार्गदर्शकांद्वारे शेअर मार्केटमधील महत्त्वाच्या संकल्पना समजणे व त्यांचा इमानेइतबारे सराव करणे ह्याला पर्याय नाही. कुठे तरी वाचलेलं आठवतंय - जिसके पास गुरु नहीं, उसका जीवन शुरु नहीं. 

- शेअर मार्केट ट्रेडर, ट्रेनर व मेंटॉर, अवधूत साठे, संस्थापक, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget